Sambhajiraje Chhatrapati: विशाळगड अतिक्रमण आंदोलन; संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल

Vishalgad encroachment issue case registered against Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 50 जणांवर शाहूवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje ChhatrapatiSakarnama
Published on
Updated on

Kolhapur News: किल्ले विशाळगड अतिक्रमण विरोधात पुकारलेले आंदोलन माजी खासदार संभाजीराजें छत्रपती यांना भोवणार असल्याचे दिसते. याप्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिसांची ही कारवाई केली आहे.

बेकायदेशीर जमाव जमवणे, सार्वजनिक मालमत्तेसह साहित्यांचा तोडफोड करणे, बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दहापेक्षा अधिक कलमे लावण्यात आली आहे. शाहूवाडी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कोल्हापुरातील विशाळगडावर काही अज्ञात व्यक्तींकडून काल (रविवारी) दगडफेक करण्यात आली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेनंतर विशाळगडावर असलेलं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजीराजे विशाळगडावर गेले होते. किल्ले विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी किल्ले विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विशाळगड परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांकडून ही जमावावर दगडफेक झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात येत आहे.

Sambhajiraje Chhatrapati
Vinod Tawde: विनोद तावडे यांनी नेत्यांना फटकारले; मुद्द्यावर बोला!

छत्रपती संभाजी राजे विशाळगडावर पोहोचल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आंदोलन मागं घेण्याची विनंती केली. मात्र,अतिक्रमणाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका संभाजी राजे छत्रपती यांनी घेतली होती. यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे घटनास्थळी दाखल झाले.

त्याठिकाणी दगडफेक झाल्याने घरे, दुकांनाचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम हाती घेणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com