Vishwas Patil : 'पानिपत'कार विश्वास पाटील यांची निवड वादाच्या भोवऱ्यात : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरच टांगती तलवार

Vishwas Patil : साताऱ्यातील 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड झाली; मात्र या निवडीवर घटनात्मक तरतुदींना बगल देण्याचा आरोप होत आहे.
Renowned writer Vishwas Patil elected president of the 99th Marathi Literary Meet in Satara; controversy erupts over selection process.
Renowned writer Vishwas Patil elected president of the 99th Marathi Literary Meet in Satara; controversy erupts over selection process.Sarkarnama
Published on
Updated on

Vishwas Patil : सातारा येथे 1 ते 4 जानेवारीदरम्यान, होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी 'पानिपत' कार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. परंतु नाव जाहीर होताच विश्वास पाटील यांची निवड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींना बगल देण्याच आल्याचा आरोप होत आहे.

अखिल भारतीय साहित्य संमेलन महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेत रविवारी महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. पण ही निवड करताना साहित्य संमेलन महामंडळाच्या घटनेत संमेलन अध्यक्षांच्या निवडीसाठी जे निकष ठरवून देण्यात आले आहेत ते पाळण्यात आले नसल्याचे आरोप होत आहेत.

लोकसत्ता या वृत्तपत्राने त्याबाबतचे वृत्तही दिले आहे. महामंडळाच्या घटनेनुसार, घटक संस्था आणि संलग्न व सहयोगी मंडळांनी रीतसर ठराव घेऊन संमेलनाध्यक्ष पदासाठीची संभावित नावे महामंडळाकडे पाठवावीत असा नियम आहे. पण पाटील यांची निवड करताना थेट बैठकीतच नावे मागवण्यात आली. त्यातही बहुतेक घटक संस्थांकडून पाटील यांचे नाव येईल, याची काळजी घेण्यात आली असा आरोप आहे.

Renowned writer Vishwas Patil elected president of the 99th Marathi Literary Meet in Satara; controversy erupts over selection process.
Vishwas Patil : छत्रपतींच्या घातपातास फक्त फंद फितुरी जबाबदार? विश्वास पाटील नेमकं असं का म्हणाले?

पाटील यांचे अध्यक्षपद धोक्यात?

महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींनुसार पाटील यांची निवड झाली नसल्यास याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. न्यायालयात आरोप सिद्ध झाल्यास पाटील यांचे अध्यक्षपद धोक्यात येऊ शकते. यावर महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी "आवश्यक सर्व घटनात्मक तरतुदींचे पालन विश्वास पाटील यांनी निवड झाली" असा खुलासा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Udaysinh Patil Undalkar-Atul Bhosale
Udayanraje Bhosale-Shivendra Raje- makrand patil-Ramraje Naik Nimbalkar-nitin patil
satara Dcc Bank Metting
Screen scrolling affects Gen Z says Vishwas Nangre Patil
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com