Priya Shinde : सातारा झेडपी अध्यक्षा प्रिया शिंदेंचा जाहीर शब्द : ‘आम्ही यशवंत विचारांचे पाईक; त्यांच्याच विचाराने कारभार चालवू’

Satara Zilla Parishad President Karad Tour : प्रिया शिंदे यांनी सातारा झेडपीत सर्वसमावेशक विकासावर भर देण्याचे सांगितले. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालत सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Priya Shinde
Priya ShindeSarkarnama
Published on
Updated on

Karad, 22 March : सातारा जिल्हा परिषदेवर आता भाजपची सत्ता आल्याने जिल्हा विकासाच्या बाबतीत राज्यात आदर्श ठरेल, त्यासाठी आम्ही सर्वांना विचारात घेऊन काम करू. सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्यावर भर दिला जाईल. कारण आम्ही यशवंत विचारांचे पाईक आहोत. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठीच आम्ही आज येथे आलो आहोत. त्यांच्या विचारांनीच जिल्हा परिषदेचा कारभार चालवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे (Priya Shinde)आणि उपाध्यक्ष राजू भोसले यांनी आज (ता. २२ मार्च) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन केले. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अभिवादनानंतर विश्रामगृहात झालेल्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.

प्रिया शिंदे म्हणाल्या, केंद्र सरकार आणि राज्यातील सत्तेच्या पाठबळामुळे सातारा (Satara) जिल्ह्याच्या विकासाला वेग आला आहे. २०१४ पासून भाजप आल्यानंतर विकास थांबलेला नाही.

(स्व.) यशवंतराव चव्हाणांना अभिप्रेत पंचायतराज व्यवस्था जिल्ह्यात राबवून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या संस्थांमधून आदर्शवत कामकाज केले जाईल. भाजपकडून केंद्रापासून ग्रामपंचायतीपर्यंत विकासकामांची गंगा वाहत आहे, त्यादृष्टीनेच जिल्हा परिषद सदस्यांनीही भाजपला कौल दिला आहे. त्यामुळे सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न करणार आहोत, असेही भोसले यांनी स्पष्ट केले.

Priya Shinde
Satara ZP Politic's : कट्टर विरोधकानेही शंभूराज देसाईंना डिवचले; ‘अन्याय होतोय तर बाळासाहेब देसाईंप्रमाणे मंत्रिपदाच्या खुर्चीवर लाथ मारा अन्‌...’

सदस्यांनी दिलेल्या विश्वासाला न्याय देत ग्रामीण भागातील विकास कामांना गती देण्याचे आश्वासन उपाध्यक्ष भोसले यांनी दिले. ग्रामविकास व सार्वजनिक बांधकाम विभागांच्या समन्वयातून प्रलंबित प्रश्न सोडवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार अतुल भोसले म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांना अपेक्षित लोकाभिमुख पंचायतराज व्यवस्था साताऱ्यात उभी करू. भाजपवर विश्वास दाखवत जिल्हा परिषद सदस्यांनी दिलेला कौल आणि दाखवलेला विश्वासाला न्याय दिला जाईल. विकासात जिल्हा राज्यभराला आदर्श ठरेल, असे काम करू.

Priya Shinde
Solapur Politic's : सचिन कल्याणशेट्टींनी फिल्डिंंग लावूनही धर्मराज काडादींच्या सिद्धेश्वर कारखान्याला कर्ज मिळेना!

जिल्हा परिषदेत सत्तास्थानी असलो तरी, विरोधी सदस्य महायुतीतीलच घटक आहेत. त्यामुळे भविष्यात सर्वांसोबत घेऊन काम करत विकासाचा वेग वाढवला जाईल. पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम आणि ग्रामविकास यांसारख्या महत्त्वाच्या विभागांतील प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावण्याचा निर्धार डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com