Solapur Politic's : सचिन कल्याणशेट्टींनी फिल्डिंंग लावूनही धर्मराज काडादींच्या सिद्धेश्वर कारखान्याला कर्ज मिळेना!

Siddheshwar Sugar factory Loan Issue : धर्मराज काडादी यांच्या भाजपशी जवळिकीची चर्चा असली तरी सिद्धेश्वर कारखान्याला एनसीडीसी कर्जासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे, त्यामुळे राजकीय प्रभाव असूनही निधी मिळण्यात विलंब होत आहे.
Dharmaraj kadadi-Sachin Kalyanshetti
Dharmaraj kadadi-Sachin KalyanshettiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 March : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शड्डू ठोकणारे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक आणि माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांची आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून भाजपशी जवळीक वाढली होती. आमदार कल्याणशेट्टी आणि कर्नाटकातील नेत्यांच्या माध्यमातून काडादी यांचा भाजपत प्रवेश होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, भाजपशी जवळीक साधूनही काडादी यांच्या सिद्धेश्वर कारखान्याला ‘एनसीडीसी’च्या कर्जासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्यातील सहा साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने (एनसीडीसी) राज्य सरकारमार्फत खेळत्या भांडवलासाठी 'मार्जिन मनी'च्या माध्यमातून सुमारे ७९८ कोटी ४० लाखांचे कर्ज मंजूर केले आहे. मात्र, त्यात काडादी यांच्या सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा (Siddheshwar Sugar factory) समावेश नाही. राज्य सरकारने नोव्हेंबरमध्येच सिद्धेश्‍वर कारखान्याच्या कर्जास थकहमी दिली. त्याला चार महिने उलटूनही त्यांचा कर्ज प्रस्ताव अजून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

कोल्हापूरमधील तीन, सांगली, अहिल्यानगर, बीडमधील प्रत्येकी एक, अशा सहा साखर कारखान्यास'एनसीडीसी'ने कर्ज मंजुरी दिली आहे. पण यामध्ये सिद्धेश्‍वर कारखान्यासह राज्यातील आठ साखर कारखान्यांच्या सुमारे एक हजार ८५२ कोटींच्या कर्जास मंजुरी मिळालेली नाही. कर्जातील मंजुरी न मिळण्यामागे प्रस्तावातील त्रुटींचे कारण दिले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत धर्मराज काडादी (Dharmaraj Kadadi) यांनी भाजपच्या विरोधात प्रचार केला होता. त्यांनी काँग्रेसच्या प्रणिता शिंदे यांना पाठिंबा दिला होता. तसेच त्यांच्या प्रचारात शेवटच्या टप्प्यात सहभागही घेतला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर तालुक्यातून निवडणूकही लढवली होती. मात्र, त्यांना त्यात अपयश आले होते.

Dharmaraj kadadi-Sachin Kalyanshetti
Satara ZP : राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपचा एक झेडपी सदस्य डांबून ठेवला होता : शिवेंद्रराजेंचा आरोप

आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या सिद्धेश्‍वर कारखान्याच्या कर्जाला भाजपप्रणित महायुती सरकारकडून थकहमी मिळत नसल्याने त्यांना संघर्ष करावा लागला. दरम्यानच्या काळात अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी काडादीच्या मदतीला आले.

काडादींच्या प्रयत्नामुळे सरकारने सिद्धेश्‍वर कारखान्यासाठी नोव्हेंबर महिन्यात थकहमी देण्यात आली. त्यानंतर काडादी यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा रंगली होती. पण कारखान्याचा कर्ज प्रस्ताव अजूनही 'वेटिंग'वरच आहे.

कर्ज मिळण्यास या आहेत अडचणी

सिद्धेश्‍वर साखर कारखान्यासह आठ कारखान्यांचा सुमारे एक हजार ८५२ कोटी १४ लाखांचा कर्ज प्रस्ताव 'एनसीडीसी'कडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. साखर कारखान्यांनी पाचपैकी तीन हंगामात ऊस गाळप करणे आवश्‍यक आहे. त्यात कारखाने बंद राहिल्याची अडचण आहे. काहींचे सरकारी हमीवरील राज्य सहकारी बँकेचे कर्ज थकीत आहे. केंद्र सरकारकडून वाढीव विस्तारीकरणासाठीचा औद्योगिक उद्योजक मेमोरँडम नसल्यामुळेही कर्ज मंजुरीला अडथळा आल्याचे सांगितले जात आहे.

Dharmaraj kadadi-Sachin Kalyanshetti
Satara ZP : गोरेंचा पलटवार : शंभूराज देसाईंनी जे पेरले, तेच उगवले; आम्ही बोललो तर फार गंभीर होईल, त्यावेळी ‘यशवंतविचार’ कुठे गेला होता?

‘कारखान्याचा प्रस्ताव एनसीडीसीकडे; लवकरच मंजुरी मिळेल’

राज्य सरकारने कारखान्याच्या कर्जास थकहमी दिली आहे. कारखान्याचा कर्ज प्रस्ताव एनसीडीसीकडे आहे. लवकरच मंजुरी मिळेल, हा विश्‍वास वाटतो, असे सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com