त्यांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही... अरूणाताई बर्गे

आमदार महेश शिंदे MLA Mahesh Shinde यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी आज कोरेगावात Koregaon रॅली Rally काढून मेळावा घेऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला.
Mahesh Shinde, Aruna Barge
Mahesh Shinde, Aruna Bargesarkarnama
Published on
Updated on

सातारा : महाराष्ट्रात सध्या स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदेंसह महेश शिंदे यांच्या समर्थनार्थ लोक अचानक रस्त्यावर उतरले आहेत. समाजासाठी आम्ही काहीतरी करतो, त्यावेळी आम्हाला कशाचीही भिती वाटत नाही. अख्खा कोरेगाव मतदारसंघ आमच्यासोबत असून आम्ही त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही आणि भीतही नाही, असा इशारा आमदार महेश शिंदे यांची बहिण अरूणाताई बर्गे यांनी दिला आहे.

आमदार महेश शिंदेंसाठी कोरेगाव मतदारसंघातील शिवसैनिकांनी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले. यासंदर्भात महेश शिंदे यांची बहिण अरूणाताई बर्गे यांनी महेश शिंदेंच्या भूमिकेचे समर्थन केले. त्या म्हणाल्या, एकनाथ शिंदेंसाहेबांसोबत ५१ आमदार गेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात स्फोटक परिस्थिती निर्माण झाले आहे. या आमदारांनी केलंय ते योग्यच केले आहे. आता हे सांगायला अचानक लोक रस्त्यावर उतरले आहेत.

Mahesh Shinde, Aruna Barge
कोरेगावात महेश शिंदे समर्थकांचे शक्तीप्रदर्शन

सध्याच्या परिस्थितीत शिवसेना कार्यकर्त्यांकडून मोडतोड सुरू असून अनेकांना धमक्यांचे फोन येत आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला कुटुंब म्हणून भीती वाटत नाही का, या प्रश्नावर अरूणा बर्गे म्हणाल्या, समाजासाठी चांगले काम करताना कशाची भीती आहे. आपण ज्यावेळी चुकीचे करत नाही, त्यावेळी भीण्याची गरज नाही. आमच्यासोबत अख्खा कोरेगाव मतदारसंघ असल्याने त्यांना आम्ही भीक घालत नाही आणि भीतही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com