`रयत शिक्षण` आम्हा सातारकरांच्या ताब्यात हवी : आमदाराची थेट मागणी

कोरेगावचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) सध्या राष्ट्रवादीच्या विरोधात उतरले आहेत.
Shivsena MLA Mahesh Shinde

Shivsena MLA Mahesh Shinde

sarkarnama

Published on
Updated on

सातारा : रयत शिक्षण संस्थेसाठी कर्मवीर भाऊराव पाटलांना आमच्या लोकांनी आर्थिक ताकद व जमिनी दिल्या. पण, आज काहींनी या संस्थेवर कब्जा केला असून आमच्या जिल्ह्याचं वाटोळं केलं आहे. काही ठराविक कुटुंबाचे राजकारण या शिक्षण संस्थेत आणतायंत. भविष्यात हे चुकीचे राजकारण आपल्याला हुसकावून लावायचे आहे. त्यासाठी मी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनापासून याची सुरवात करत आहे. जिल्ह्यातील संस्था जिल्ह्यातील लोकांच्या ताब्यात राहिल्या पाहिजेत, असे खळबळजनक वक्तव्य करून कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी करून नवीन वादाला तोंड फोडले आहे.

आमदार महेश शिंदे कोरेगाव तालुक्यातील चंचळी येथील कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने एक विचार क्रांतीचा देणार आहे. रयत शिक्षण संस्था ही सातारा जिल्ह्याची आमच्या मालकीची आहे. परंतु काहींनी त्या संस्थेवर कब्जा केला आणि आमच्या जिल्ह्याच वाटोळं केल आहे. गेल्या सात ते आठ वर्षात आमच्यातील एकही तरूण त्या रयत शिक्षण संस्थेत कधीही भरलेला नाही. त्यावेळी आमच्या लोकांनी पैसे दिले.

Shivsena MLA Mahesh Shinde

उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती तरी आदित्य हेच ठरले आकर्षणाचे केंद्रबिंदू

आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटलांना आम्ही अर्थिक ताकद दिली. आम्ही जमिनी दिल्या. परंतु काही ठराविक लोक चुकीच्या पध्दतीने कुटुंबाच राजकारण शिक्षण संस्थेत आणतायंत. भविष्यकाळात त्यांच हे चुकीच राजकारण आपल्याला हुसकवून लावलं पाहिजे. यांची सुरवात आज मी यादिवशी करतोय, जे आमच्या जिल्ह्याची ताकद आहे. ज्या संस्था आमच्या जिल्ह्याच्या आहेत. त्या आमच्या जिल्ह्यातला लोकांच्या ताब्यात राहिल्या पाहिजेत, यांची सुरूवात चंचळीच्या व्यासपीठावरून करत आहे.

Shivsena MLA Mahesh Shinde

'चंद्रकांत पाटील हे कोणत्या पक्षाचे आमदार त्याचे सर्टिफिकेट खडसेंनी देऊ नये'

महेश शिंदे म्हणाले, यापुढे कोरेगाव मतदार संघातील कुठल्याही गोष्टीला कोणीही येवून हात लावू शकणार नाही. विधानसभेवेळी जरंडेश्वर कारखान्याबाबतीत सांगितले होते. त्याचा पंचनामा झाला आणि 27 हजार कोटीचा घोटाळा बाहेर आला. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. भविष्यामध्ये ही भूमिका घेवून राज्यात आणि जिल्ह्यात फिरणार आहे. रयत शिक्षण संस्थेत मुलांच्या शिक्षणासाठी पैसे घेतले जातात. शासनाचे 1540 कोटी रूपये अनुदान येत असतानाही पैसे घेतात ही शोकांतिका आहे.

Shivsena MLA Mahesh Shinde

कोरोनाची रूग्णसंख्या वाढल्यास कठोर निर्णय घेणार : अजित पवार

डी. पी. भोसले कॉलेजमध्ये पैसे घेतले जातात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चांगल्या पध्दतीचे व सामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी ही संस्था काढली. पण आता त्याच बाजारीकरण चालले आहे. त्यासाठी महेश शिंदे तुमच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल. हाच विचार घेवून आपण पुढे निघायलो आहे. एकदिवस जरंडेश्वर कारखान्यांचा विचार घेवून निघालो आणि यशस्वी झालो. आज हा विचार घेवून व्यासपीठावरून जातोय, मला माझ्या राजकारणांची चिंता नाही. मला पाडायला कितीपण ताकद लावा. माझ्यासोबत भगवंत आणि सामान्य जनता आहे. कुठलाही 'माय का लाल' मला हरवू शकत नाही, असा इशाराही आमदार महेश शिंदे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com