Babanrao Autade : बबनराव आवताडेंचा भाजप नेत्यांना सूचक सल्ला: ‘आम्ही तुम्हाला सहकार्य करु; पण तुमचे मतदारही व्यवस्थित हाताळा’

Solapur Vidhan Parishad Election 2026 : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राजेंद्र राऊत यांनी मंगळवेढ्यात बबनराव आवताडे यांची भेट घेत समर्थन मिळविण्यासाठी राजकीय संपर्क वाढविल्याची चर्चा आहे.
Babanrao Autade
Babanrao AutadeSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 08 June : सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक मतदार असतानाही उमेदवार राजेंद्र राऊतांनी मतांची गोळाबेरीज थांबवलेली नाही. राऊत यांनी आज (ता. ०८ जून) तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे बबनराव आवताडे यांच्या मंगळवेढ्यात जाऊन भेट घेतली. या भेटीत आवताडेंनी राऊतांना मदतीचा शब्द दिल्याची माहिती आहे. ‘आम्ही तुम्हाला सहकार्य करू. मात्र, तुमचे मतदारही व्यवस्थित हाताळा,’ असा सल्ला आवताडेंनी भाजप नेत्यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी मंगळवेढा खरेदी-विक्री सहकारी संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात बबनराव आवताडेंची भेट घेतली. या वेळी आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, नगराध्यक्ष सुनंदा अवताडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते.

मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि भाजप यांच्यात दुरंगी लढत झाली होती. नगराध्यक्षपदाच्या लढतीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा आवताडे यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला हेाता. तसेच, काही नगरसेवकही विजयी झाले आहेत.

गेल्या पंधरवड्यात शहरातील प्रमुख प्रश्नाच्या संदर्भात बबनराव आवताडे आणि खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शहरातील प्रश्न सोडवण्याची विनंती केली होती. त्या भेटीनंतर बबनराव आवताडे यांची भाजपच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याची चर्चा रंगली होती.

Babanrao Autade
Raut Meet Deshmukh : राजेंद्र राऊतांनी चौथ्यांदा घेतली विजयकुमार देशमुखांची भेट : पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला प्रचार दौऱ्यात सहभागी

विधान परिषदेच्या निवडणुकीत एकट्या भाजपकडे ३०० पेक्षा जास्त मते आहेत, तर महायुतीतील पक्षांसह तो आकडा ५०० च्या पुढे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमच्यासोबत अदृश्य शक्ती असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर राजेंद्र राऊत हे गाफील न राहता पूर्ण ताकतीने कामाला लागले आहेत.

उमेदवाराच्या शर्यतीत असलेले प्रशांत परिचारक यांना सोबत घेऊन राऊत यांनी आज मंगळवेढ्यात गाठीभेटी घेतल्या. मंगळवेढ्यात बबनराव आवताडे यांची राजेंद्र राऊत यांनी भेट घेतली आहे. त्यांच्यासोबत आमदार विजयकुमार देशमुख, प्रशांत परिचारक हेही उपस्थित होते.

या वेळी झालेल्या चर्चेत भाजप नेत्यांनी बबनराव आवताडे यांनी निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानंतर आवताडे यांनीही राजेंद्र राऊत यांना मदतीचा शब्द दिला आहे. पण एक महत्वपूर्ण सल्लाही दिला आहे. ‘आम्ही तुम्हाला सहकार्य करू; मात्र तुमचे मतदारदेखील तुम्ही व्यवस्थित हाताळा,’ असा सल्ला बबनराव आवताडे यांनी दिल्याने सांगण्यात येत आहे.

Babanrao Autade
Mohite-Patil Vs Gore : धैर्यशील मोहिते पाटलांचे जयकुमार गोरेंना सडेतोड उत्तर : ‘मोहिते पाटलांना सोलापूरच्या जनतेनं उभं केलंय अन्‌...’

समाधान आवताडेंनी चुलत्यासोबत एकत्र येणे टाळले

राजेंद्र राऊत यांनी जिल्हा सहकारी बॅंकचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडेंची मंगळवेढ्यात भेट घेतली. मात्र, आमदार समाधान आवताडे यांनी सिद्धेश्वर आवताडे यांच्या कार्यालयात येणे टाळले. पण आमदार आतवाडे यांनी भाजप नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांची मत जाणून घेऊन त्यांना निवडणुकीत सहकार्याचे आवाहन करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com