Devendra Fadnavis : कोल्हापूरला आम्ही काहीही कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्र्यांनी फुटबॉलप्रेमींसाठी केली मोठी घोषणा

Kolhapur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरबद्दल विशेष प्रेम व्यक्त करत कोल्हापूरकरांनी दिलेल्या आशीर्वादाची परतफेड विकासकामांतून करण्याचे आश्वासन दिले. कोल्हापूरला काहीही कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 09 August : आमचं विशेष प्रेम कोल्हापूरवर आणि कोल्हापूरच्या तांबड्या-पांढऱ्या रश्श्यावरदेखील आहे. आम्हाला कोल्हापूरकरांनी भरपूर आशीर्वाद दिले आहेत, त्यामुळे कोल्हापूरला आम्ही काहीही कमी पडू देणार नाही, असा जाहीर शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने कोल्हापूर येथे उभारण्यात आलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या इमारतीचे उद्‌घाटन करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापूरबाबत मोठी घोषणा केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज आपल्या सगळ्यांसाठी समाधानाचा दिवस आहे. आज एक महत्वाचं उद्‌घाटन केलं आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांची आज जयंती आहे. आज केशवराव भोसले नाट्यगृहाची इमारत पूर्ण होऊन उद्‌घाटन झालं आहे. दोन वर्षांपूर्वी हे नाट्यगृह जळालं होतं. आम्हाला अजितदादांनी तातडीने नाट्यगृहाबद्दल सर्व माहिती दिली होती. त्यानंतर त्यासाठी 25 कोटी निधी देऊन इमारत तातडीने उभा केली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ऐतिहासिक महत्त्व आहे. छोटे असले तरी महाराष्ट्राचा केंद्रबिंदू म्हणून या नाट्यगृहाकडे पाहिले जाते.

कोल्हापुरात आता क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने होतील, अशा दर्जाचे मैदान उभा केलं जाणार आहे. कोल्हापूर हे फुटबॉलप्रेमींचे शहर म्हणून ओळखले जाते. तिकडे एक मेस्सी खेळत होता आणि कोल्हापुरात अनेक मेस्सी खेळत होते. शाहू महाराज यांनी फुटबॉलकडेदेखील लक्ष देण्याची विनंती केली आहे, त्यामुळे फुटबॉलसाठीही चांगलं मैदान उभं केलं जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis
Beed News : ठाकरेंच्या नेत्यांचा सुनेत्रा पवारांना सल्ला : बीडबाबत निर्णय घेताना सुनील तटकरेंना बाजूला ठेवा; कारण ते ‘कटकरें’च्या भूमिकेत...

मुख्यमंत्री म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणं खूप गरजेचं आहे. पण, ग्रामीण भागातील नागरिकांची कुठंही अडचण होऊ देणार नाही. जाहीर करताना आनंद करू की दुःख व्यक्त करू, कळत नाही. दीड दिवसाच्या सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना एक बैठक केली आणि पूर नियंत्रण प्रकल्पाला मंजुरी दिली.

कितीही पाऊस पडला, तर कुठे पाणी येतं, याच एक मॉड्यूल तयार केलं. पुराचं 30 ते 40 टक्के पाणी दुष्काळी भागात कॅनॉलच्या माध्यमातून नेलं जाणार आहे. पुराच्या पुढच्या काळात मराठवाड्याला फायदा होईल, असं नियोजन आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Shivsena UBT : ठाकरेंच्या आमदाराची संपर्कप्रमुखांच्या बैठकीला दांडी; अंधारेंचा सूचक इशारा, ‘काय संदेश द्यायचा, तो मी दिलाय...’

ते म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ करणं, फार गरजेचं आहे. शहराचा विकास करायचा असेल, तर हे होण गरजेचं आहे. कारण,100 टक्के लोकांच्या समस्या सोडवतो, असं लोकप्रतिनिधींना आश्वासन देतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com