Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर अन्‌ मनीषा मुसळे-मानेंच्या मोबाईल CDRमध्ये दडलंय काय? पोलिस म्हणतात, ‘पुरावे द्या; कारवाई करतो...’

Solapur Crime News : डॉ. शिरीष वळसंगकर यांचे अनेक निकटवर्तीय खासगीत आणि माध्यमांकडे आत्महत्येमागे गृहकलह असल्याचे नमूद करतात. मात्र, पोलिसांसमोर कोणीही बोलायला तयार नाही. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी आपली भूमिका विशद केली.
Dr. Shirish Valsangkar
Dr. Shirish Valsangkar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 May : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. डॉ. वळसंगकर यांचे दोन्ही मोबाईल, तसेच अटकेतील संशयित आरोपी मनीषा मुसळे माने हिच्याही मोबाईलचा सीडीआर काढण्यात आला आहे. याबरोबर घटनेच्या दिवशी आणि आदल्या दिवशी डॉक्टरांच्या घरी आणि दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याची पडताळणी करण्यात आली आहे, मात्र झाली असून त्यात नेमके काय समोर आले, याबद्दल पोलिसांनी मात्र काही सांगितलेले नाही.

दरम्यान, डॉक्टर वळसंगळकर (Dr. Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्येप्रकरणी माध्यमांकडे किंवा अन्य कोणाकडेही माहिती, पुरावे असतील तर द्यावेत. त्याची पडताळणी करण्यात येईल आणि दोषी कोणीही असले तरी त्यांना पोलिस सोडणार नाहीत, असे तपास अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी अजित लकडे यांनी सांगितले आहे. तसेच, तपासाला अडथळा येतील किंवा संशयित आरोपीला फायदा होईल, अशा गोष्टी टाळाव्यात, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांचे अनेक निकटवर्तीय खासगीत आणि माध्यमांकडे आत्महत्येमागे गृहकलह असल्याचे नमूद करतात. मात्र, पोलिसांसमोर कोणीही बोलायला तयार नाही. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस (Police) अधिकाऱ्यांनी आपली भूमिका विशद केली. डॉक्टर आणि त्यांच्या घरातील सदस्यांचे कॉल रेकॉर्ड पडताळून पाहिले का? त्याची पडताळणी केल्यास गृहकलहाचे धोगेदारे उलगडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार हे प्रकरणी सीआयडीकडे देण्यात येईल का, याचीही उत्सुकता आहे.

Dr. Shirish Valsangkar
Sayaji Shinde : निवडून दिलंत आता बसा बघत; युद्ध करून माणसं मारायला नकोत : सयाजी शिंदे यांचे सद्यस्थितीवर भाष्य

डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेली हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिची न्यायालयीन कोठडी शुक्रवारी (ता. ९ मे) संपणार आहे. पण अद्याप पाेलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावले नाही. पोलिसांनी रुग्णालयात जाऊनही कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले आहेत. डॉक्टरांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आली आहे. मात्र, या चौकशीत पोलिसांच्या हाती काय लागले, असा सवाल उपस्थित आहे.

Dr. Shirish Valsangkar
Jaykumar Gore Case : जयकुमार गोरे बदनामी प्रकरण : पोलिस कोठडीत आपल्याला मारहाण; तुषार खरातांची न्यायालयात तक्रार

दरम्यान, गुन्ह्याचा तपास सुरू केल्यापासून ९० दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावे लागते. पण, तपास सुरू होऊन येत्या काही दिवसांत वीस दिवस होऊ शकतात. डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आलेली आहे. दोषारोपपत्र दाखल करेपर्यंत संशयित आरोपीला जामीन मिळू नये, यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. मुसळे माने हिचे वकिल प्रशांत नवगिरे यांनीही जामिनीसाठी अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे ९ तारखेला नवगिरे हे सुनावणी काय मुद्दे मांडणार, हेही पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com