Sayaji Shinde : निवडून दिलंत आता बसा बघत; युद्ध करून माणसं मारायला नकोत : सयाजी शिंदे यांचे सद्यस्थितीवर भाष्य

Pahalgam Terrorist Attack : सध्याच्या पार्श्वभूमीवर युद्ध व्हायला हवं का? असं विचारलं असता शिंदे म्हणाले, युद्ध कधीच व्हायला नाही पाहिजे. देशात नाही, ना राज्यात नाही. माणूस म्हणून माणसाने माणसाकडे बघितलं पाहिजे.
Sayaji Shinde
Sayaji ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune, 06 May : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरामध्ये अत्यंत वेगाने घटना घडताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सद्य परिस्थितीमध्ये कधीही भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ शकतं, अशी शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही उपाययोजना देखील करण्यात येताना पाहायला मिळत आहेत. सरकारकडून देशभरामध्ये ‘मॉक ड्रील’चे आयोजन केले आहे. मात्र, सध्याच्या सरकारच्या भूमिकेवर आणि उद्भवलेल्या परिस्थितीवर अभिनेते सयाजी शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सयाजी शिंदे (Sayaji Shinde) म्हणाले, देशाचे संविधान हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तो आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असून संविधानाची व्हॅल्यू आपल्याला कळली पाहिजे. संविधान जपण्याच्या दृष्टिकोनातून आपण कठीण काळात आहोत. आपण सर्वांनीच नैतिकता जपली पाहिजे. आपण मूळ माणुसकीचं सत्व विसरत चाललो असून त्यामुळे सगळं वाटोळे होत आहे, असं सयाजी शिंदे म्हणाले.

पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) देशभरामध्ये युद्धजन्य वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात मॉक ड्रिल होत आहे. याबाबत बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, आपण तहान लागली की विहीर खोदायला घ्यायची, हे कितपत सध्या होईल, हे मला माहिती नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीत जी गरज आहे, ती करायला हवी. मॉक ड्रिल करून अवेअरनेस आणणे गरजेचे आहे.

Sayaji Shinde
Jaykumar Gore Case : जयकुमार गोरे बदनामी प्रकरण : पोलिस कोठडीत आपल्याला मारहाण; तुषार खरातांची न्यायालयात तक्रार

एखाद्या बिल्डिंगमध्ये आग लागली तरी माणस बिल्डिंगमधून खाली उतरायला तयार नसतात. निराश आणि कंटाळा हा आपला स्वभाव आहे. त्यामुळे मॉक ड्रिल करून आपण अवेर झालं पाहिजे, असं मत सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

सयाजी शिंदे पुढे म्हणाले, आपण मतदान कुठ नीट करतो, आपल्याकडे मतदानाची प्रकिया तरी कुठ नीट होते, हे मूळ आहे आणि एकदा निवडून दिलं तर आपल्या हातात काही राहात नाही. त्यामुळे आता मतदान केलं आहे तर बसा बघत काय होत ते. आपल्या हातात तेवढेच आहे आता. आपण काही म्हटल्याने फरक पडणार आहे का? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.

Sayaji Shinde
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित केली ‘ही’ मागणी

सध्याच्या पार्श्वभूमीवर युद्ध व्हायला हवं का? असं विचारलं असता शिंदे म्हणाले, युद्ध कधीच व्हायला नाही पाहिजे. देशात नाही, ना राज्यात नाही. माणूस म्हणून माणसाने माणसाकडे बघितलं पाहिजे. पहलगामसारखा हल्ला परत घडू नये; म्हणून जे हवं ते करायला हवं. मात्र, माणसं मारूनच ते करायला हवं, याचा वरच्या पातळीवर विचार व्हायला हवा, असं शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com