तटकरे, पाटील, पटेल एकत्र मुख्यमंत्र्यांना भेटण्याचं कारण काय? चंद्रकांत पाटलांचं थेट भाष्य

Maharashtra Politics: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांनी एकाचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांनी एकाचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली होती. तिघांनी एकत्र भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे एनडीए सोबत चर्चा करणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीत या तिघांनी घेतलेल्या एकत्र भेटीमागे काही महत्वाच्या घडामोडी घडत असाव्यात अशी शंका निर्माण झाली आहे. त्यावर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत याची हवाच काढून टाकली.

Chandrakant Patil
Rajabhau Waje : सायंकाळच्या लोडशेडिंगमुळे होणारे शेतकऱ्यांचे हाल थांबवा ; खासदार राजाभाऊ वाजे आक्रमक

तिघे एकत्र जाण्यामागे वेगळे काही कारण असेल असे वाटत नाही. त्यांचे काहीतरी सामायिक काम असेल, अन्यथा, कुणाला सोबत घेण्याबाबतचा प्रस्तावच आमच्यासमोर नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले. ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस पहाटे तीनपर्यंत लोकांना भेटतात. त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. लोक काही ना काही कामे घेऊन जात असतात. त्यामुळे तटकरे, जयंतराव एकत्र गेले असावेत. आमच्यात कोअर कमिटी आहे. त्यात कुणाला घ्यायचे आहे का, यावर आधी चर्चा होते. मग, त्याचे चांगले काय, वाईट काय परिणाम यावर विचार होतो. त्याचा प्रस्ताव येतो, मग पुढे चर्चा जाते"

Chandrakant Patil
Government decision : मोठी बातमी: अत्याधुनिक कॅन्सर उपचार आता ग्रामीण भागातही उपलब्ध; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे का? यावर उत्तर देताना मला याबाबत माहिती नाही. कारण त्यासाठी कमिटीसमोर प्रस्ताव यावा लागतो, तसा प्रस्ताव अद्याप आलेला नाही, असंही त्यांनी सांगितलं. शिवसेना उबाठा गटाकडून नागपुरात केल्या जाणाऱ्या रामरक्षा आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले, "रामरक्षा म्हणायला त्यांना कारण लागतं. आम्ही रोजच म्हणतो. मी दररोज पिंडीवरचा अभिषेक करतोच. अतिशय एकाग्रपणे मी जप करतो. त्यांना श्रद्धेपेक्षा राजकारण करायचे आहे. एखाद्या देवळात चार कर्मचाऱ्यांनी घोटाळा केला, तर तो मुख्यमंत्री, पंतप्रधानांपर्यंत कसा जातो? मी चोरीचे समर्थन करत नाही, मात्र, त्यात राजकारण करू नये"

Chandrakant Patil
Nanded News: व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवलं! वरिष्ठांना दोष देत ZP शिक्षकाने दोन मुलांसह संपवलं आयुष्य; कारमध्ये बसून ती नदीत घातली

विठ्ठलाला का अडचणीत आणता? कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले आहे की, "पंढरपुरात विठ्ठलाला साकडे घालणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळो आणि सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनाव्यात. याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, "असे साकडे घालून थोडेच काही होणार आहे. विठ्ठलाला का अडचणीत आणता. पाऊसपाणी, शेतकरी हिताची मागणी करा"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com