Prashant Paricharak : प्रशांत परिचारक विधीमंडळात कधी दिसणार?; बावनकुळेंनी पंढरपुरात येऊन दिलेला शब्द भाजप पाळणार का?

Pandharpur Political News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे परिचारक यांची समजूत घालण्यासाठी पंढरपुरात आले होते. परिचारक वाड्यावर त्यांची तब्बल दोन तास बैठक रंगली होती. परिचारकांनी माघार घेऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव होता.
Prashant Paricharak
Prashant Paricharak Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 December : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून माघार घेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पुन्हा एकदा माघार घेत समाधान आवताडे यांच्या आमदारकीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. परिचारक यांनी माघार घ्यावी, यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिष्टाई केली होती. त्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतरच परिचारकांनी माघार घेतली होती, त्यामुळे बावनकुळे यांनी पंढरपुरातील परिचारक वाड्यावर येऊन दिलेला शब्द भाजप कधी पूर्ण करणार आणि परिचारकांचे राजकीय पुनर्वसन कधी होणार, याकडे परिचारक समर्थकांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असणाऱ्या प्रबळ नेत्यांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द देऊन थांबविण्यात आले होते. त्यात सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे बडे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांचा समावेश होता. परिचारक यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी केली होती. कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून परिचारक यांनी रणशिंग फुंकले होते. परिचारक हे प्रबळ दावेदार होते, पण आवताडे हे विद्यमान आमदार होते, त्यामुळे कोणाला तिकिट द्यायचे, हा प्रश्न भाजपश्रेष्ठींपुढे होता.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे परिचारक यांची समजूत घालण्यासाठी पंढरपुरात आले होते. परिचारक वाड्यावर त्यांची तब्बल दोन तास बैठक रंगली होती. परिचारकांनी माघार घेऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव त्यांच्यावर होता. दुसरीकडे, परिचारक यांनी माघार घ्यावी, यासाठी बावनकुळे मनधरणी करत होते. अखेर परिचारकांनी बावनकुळे आणि भाजप श्रेष्ठींचा शब्द मान्य करत आवताडेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

Prashant Paricharak
Pratap Sarnaik-Video : प्रताप सरनाईकांनी आपला शब्द खरा केला; पनवेल-खोपोली एसटीने प्रवास केला!

परिचारक यांचे राजकीय पुनर्वसन करण्याची जबाबदारी आता भाजपश्रेष्ठींची आहे. प्रशांत परिचारक हे विधीमंडळात दिसतील, असे विधान बावनकुळे यांनी केले होते. राज्याचे मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊन सरकारचे काम सुरळीतपणे सुरू झाले आहे, त्यामुळे शब्द दिलेल्या राजकीय नेत्यांचे पुनर्वसन कधी होणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे, त्यामुळे परिचारक आता विधीमंडळात कधी दिसणार, असा सवाल परिचारक समर्थक विचारत आहेत.

दरम्यान, निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी भारतीय जनता पक्षाने प्रशांत परिचारक यांना पणन महामंडळाचे अध्यक्ष केले होते. त्याची यादीही जाहीर केली होती. मात्र, राज्य सरकारकडून त्याची अधिकृत अधिसूचना जाहीर झाली नव्हती, त्यामुळे महामंडळाच्या अध्यक्षपदाची अधिसूचना कधी जाहीर होणार आणि परिचारक यांना विधीमंडळात कधी संधी मिळणार, याची उत्सुकता आहे.

Prashant Paricharak
Santosh Deshmukh Murder : देशमुख खून प्रकरणावर मुंडेंचे मोठे भाष्य; ‘माझ्या जवळचा असला तरी सोडू नका, त्यालाही फाशी द्या’

सोलापूरच्या स्थानिक स्वराज संस्थेतून निवडून द्यायच्या विधान परिषदेची जागा रिक्त आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्या निवडणुका होऊ शकतात, त्यामुळे मागील वेळी याच जागेवरून जिंकून आलेले परिचारक यांना पुन्हा एकदा या जागेवर संधी दिली जाते का हेही पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com