Kolhapur Politics: सतेज पाटलांनी फोडला नवा राजकीय बॉम्ब; कोल्हापूर लोकसभेसाठी 'सरप्राईज' चेहरा ?

Satej Patil: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार ?
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार ? याची उत्कंठा कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. एकीकडे भाजपने आपली यंत्रणा तळागाळापर्यंत पोहोचवली असताना महाविकास आघाडीच्या गोटात मात्र अद्यापही शांतता आहे.

अशातच काँग्रेसचे नेते, कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी राजकीय बॉम्ब फोडून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे कोल्हापूर लोकसभेचा उमेदवार कोण असणार ? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अनेक जण इच्छुक आहेत. त्यामध्ये सरप्राईज उमेदवार येऊ शकतो. सरप्राईज चेहरा येऊ शकतो, निवडून येणारा उमेदवार आम्ही देणार आहोत, असे लोकसभेचे महाविकास आघाडीच्या उमेदवारांबाबत संकेत देत पाच इच्छुकांमधील एक चेहरा असू शकतो. जागा कोणालाही सुटली तरी तिन्ही पक्षांत चर्चा होईल, असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

Satej Patil
Mahavikas Aghadi : 'वंचित'ला महाविकास आघाडीत घेण्याबाबत काय ठरलं ? नाना पटोलेंचं मोठं भाष्य

शिवसेना (ShivSena) शिंदे गटाच्या शिव संकल्पयात्रेवरून बोलताना, संकल्पयात्रेतून काय विकल्प मिळाला ? हे लोकांना कळलेलं नाही. त्यामुळे नवीन यात्रेतून जनतेला काय मिळणार आहे ? असा सवाल आमदार पाटील यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना राज्यातील कोणत्या लोकसभेच्या जागा हव्यात, याची लिस्ट पाठवलेली आहे. आगामी काही काळात याची स्पष्टता येईल. महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून येण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न असणार आहेत. तिन्ही पक्षांपैकी जागा कुणाला मिळणार ? यापेक्षा भाजपविरोधात लढणे हीच आमची भूमिका असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासोबत 'इंडिया' आघाडीत येण्यासाठी दोन वेळा प्राथमिक चर्चा झाली आहे. शेवटपर्यंत त्यांना आमच्यासोबत घेण्याचा प्रयत्न सुरू राहणार आहे, असा आशावाद पाटील यांनी व्यक्त केला.

(Edited By Ganesh Thombare)

Satej Patil
Mumbai News : ट्रकचालक आंदोलनाचा मुंबईकरांना फटका ; जीवनावश्यक वस्तूंना लागणार रोख ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com