Mumbai News : ट्रकचालक आंदोलनाचा मुंबईकरांना फटका ; जीवनावश्यक वस्तूंना लागणार रोख ?

Hit and Run Law : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात टँकरचालक आक्रमक
Mumbai tanker driver strike
Mumbai tanker driver strikeSarkarnama
Published on
Updated on

- जुई जाधव

Mumbai News : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याविरोधात नागपूरसह देशभर विविध ठिकाणी ट्रकचालकांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गावरची वाहतूक खोळंबली होती. काही ठिकाणी जरी संप मागे घेण्यात आला असला तरीदेखील हा संप काही ठिकाणी हा संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा खूप मोठा परिणाम मुंबईकरांवरदेखील होऊ शकतो.

मुंबई (Mumbai) मध्ये अधिकतर वस्तू या टँकरनेच येतात. पहाटे येणाऱ्या भाज्या, किराणा मालातील धान्य, दूध अशा दररोज जीवनात आवश्यक असलेल्या गोष्टी या टँकरने येतात. काल या आंदोलनाला एक हिंसक वळण लागलं. आज जरी मुंबईत टँकरने सर्व वस्तू वेळेवर पोहोचल्या असतील, परंतु जर हा संप असाच सुरू राहिला, तर मात्र मुंबईतील नागरिकांची कोंडी होऊ शकते.

Mumbai tanker driver strike
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा आजपासून मुंबईत 'ठिय्या'

दररोज लागणाऱ्या साहित्याचा जर पुरवठा झाला नाही, तर जीवनावश्यक वस्तूंना लागणारा रोख लागू शकतो. सकाळी लागणारे दूध जर मिळालं नाही तर चहा मिळणार नाही. स्वयंपाकासाठी लागणार भाजीपाला नसेल आणि धान्यदेखील उपलब्ध नसेल तर मात्र जेवणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नागरिक हॉटेलचा पर्याय निवडतीलदेखील, मात्र हॉटेलदेखील महागतील आणि पदार्थांचे दरदेखील वाढतील.

राज्यात पेट्रोल पंप काही ठिकाणी बंद आहेत, मात्र जर हा संप असाच सुरू राहिला तर जी परिस्थिती राज्यातील काही ठिकाणी दिसून येत आहे तीच मुंबईतही दिसून येईल. पेट्रोल पंपबाहेर लांबच लांब रांगा, नोकरीवर जाण्यासाठी उशीर अशा अनेक समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावं लागेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं, की यावर चर्चा करून तोडगा काढू, पण ते केव्हा अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आता हे आंदोलन किती वेळ सुरू राहील आणि कशी परिस्थिती निर्माण होते, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

(Edited by Amol Sutar)

Mumbai tanker driver strike
Sanjay Raut : राज्यात उद्भवलेली परिस्थिती अभूतपूर्व ; टँकरचालक संपावरून राऊतांचा हल्लाबोल...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com