Solapur Lok Sabha : ‘वंचित’च्या उमेदवाराची सोलापूरमधून माघार; भाजप-काँग्रेसमध्ये थेट लढत होणार

Loksabha Election 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. याबाबतची घोषणा ते लवकरच करणार असून, आपली भूमिका ते माध्यमांसमोर मांडणार आहेत.
Rahul Gaikwad
Rahul GaikwadSarkarnama

Solapur, 22 April : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यबाबतची घोषणा ते लवकरच करणार असून, आपली भूमिका ते माध्यमांसमोर मांडणार आहेत. गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे आता सोलापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात थेट लढत होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency) अक्कलकोटचे राहुल गायकवाड (Rahul Gaikwad) यांना उमेदवारी जाहीर केली होती. गायकवाड यांची उमेदवारी सोलापूरसाठीही नवखी होती. त्यावेळी त्यांच्या उमेदवारीची चर्चा झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gaikwad
Solapur 'Vanchit' News : माझ्या हातात बंदूक दिली, पण गोळ्या दिल्या नाहीत; सोलापूरमधील ‘वंचित’च्या उमेदवाराचा गंभीर आरोप

राहुल गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज छाननीत वैध ठरला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. याबाबतची घोषणा ते लवकरच करणार आहेत. पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका मांडणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे गायकवाड यांच्याबरोबरच काही अपक्ष उमेदवारांनीही माघार घेतली आहे.

दरम्यान, राहुल गायकवाड यांच्या माघारीमुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात आता काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात थेट लढत होणार आहे. वंचितने उमेदवार मागे घेण्यापूर्वीच एमआयएमने सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात लढत होणार हे आता निश्चित झाले आहे.

R

Rahul Gaikwad
Vishal Patil News : सांगलीत तिरंगी लढत; काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com