Rajendra Yadravkar News : आंदोलनाला गेले अन् फराळ खाऊन आले ; यड्रावकरांनी केला पाहुणचार!

Swabhimani Shetkari Sanghatana : साखर कारखानदारांनादेखील दिवाळी साजरी करून देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला होता.
Yadravkar
YadravkarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : मागील ऊस हंगामातील ४०० रुपयाला नकार दिल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांनी कारखानदारांना आज खर्डा भाकरीचा फराळ दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र कारखानदारांना खर्डा भाकरी देऊन आंदोलन केले असताना जयसिंगपूर मधीलच आंदोलन चर्चेचा विषय ठरले. माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गेले असता, आंदोलनकर्त्यांचा यड्रावकर यांनी चांगलाच पाहुणचार केला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नुकतीच झालेली ऊस परिषदेत कारखानदारांच्या विरोधात आंदोलनाची विविध टप्पे राजू शेट्टी यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होत नसताना साखर कारखानदारांनादेखील दिवाळी साजरी करून देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला होता.

त्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी (आज) कारखानदारांच्या घरात जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना दिवाळीचा फराळ म्हणून कांदा,खर्डा, भाकरी म्हणून भेट देईल, असे शेट्टी यांनी जाहीर केले होते.

Yadravkar
Pawar Family : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबीय प्रथमच जमलं एकत्र; जाणून घ्या, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

त्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज माजी मंत्री आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जयसिंगपूर निवासस्थानी खर्डा भाकरी देण्यासाठी गेले. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घराबाहेरदेखील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.या वेळी आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, त्यांचे बंधू संजय पाटील-यड्रावकर घरी उपस्थित होते. त्यांनी आंदोलकांना घरात बोलावन त्यांच्यासाठी दिवाळीचा फराळ खाण्यास दिला.

Yadravkar
Bachchu Kadu on Maratha Reservation : पवारांनी तेव्हाच आरक्षणात घेतलं असतं, तर मराठ्यांचा प्रश्नच मिटला असता

आंदोलनाच्या गप्पा न मारता इतर विषयांवर ही चर्चा केली. जाता जाता संजय पाटील यड्रावकर यांनी इतर कार्यकर्त्यांनादेखील डबा भरून फराळ दिला. यड्रावकर यांच्या घराबाहेर आंदोलनासाठी केलेल्या कार्यकर्त्यांचा यड्रावकर यांनीच पाहुणचार केल्यामुळे याची जोरदार चर्चा झाली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com