Mohol Politics : राजन पाटलांच्या गोटात काय शिजतंय? मानेंचा सुळेंसोबत प्रवास, तर जयंतरावांचा पाटलांना फोन

Rajan Patil : राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील हे दोघेही उपमुख्यमंत्री अजित पवार गटात आहेत. आमदार माने हे मोहोळमधून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत, त्यांची उमेदवारी राजन पाटील यांनी स्वतः महिनाभरापूर्वी जाहीर केली आहे.
Supriya Sule-Yashwant Mane-Jayant Patil-Rajan Patil
Supriya Sule-Yashwant Mane-Jayant Patil-Rajan PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 30 August : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून एकत्रित प्रवास केला, तर मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यालयातून फोन आल्याची जोरदार चर्चा आहे, त्यामुळे मोहोळ राष्ट्रवादी आणि राजन पाटील यांच्या गोटात नवं काही शिजतंय का?, असा सवाल दबक्या आवाजात विचारला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे आमदार यशवंत माने (Yashwant Mane) आणि माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) हे दोघेही उपमुख्यमंत्री अजित पवार गटात आहेत. आमदार यशवंत माने हे मोहोळमधून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. त्यांची उमेदवारी माजी आमदार राजन पाटील यांनी स्वतः महिनाभरापूर्वी जाहीर केली आहे, त्यामुळे नव्याने घडणाऱ्या घडामोडींमुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात अनेक काही राजकीय घडामोडी करणार का, असा सवाल विचारला जात आहे.

यशवंत माने यांची महायुतीकडून मोहोळ मतदारसंघातून (Mohol Constituency) विधानसभेची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, महायुतीमधील काही घटक आज स्थानिक राजकारणाच्या नावाखाली माने यांच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून आजी माजी आमदारांच्या विरोधात विरोधकांनी रान उठवले आहे, त्यामुळे महायुती पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला एकदम सुक्षित असणारा मतदारसंघ तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्दावरून काहींसा अडचणीचा वाटू लागला आहे.

Supriya Sule-Yashwant Mane-Jayant Patil-Rajan Patil
Chhatrapati Shivaji Maharaj statue : 'पळून पळून कुठे जाणार'; असं अजित पवार का म्हणाले?

अप्पर तहसील कार्यालयावरून मोहोळमध्ये असलेले विरोधाचे वातावरण आणि वरिष्ठ पातळीवरून होणाऱ्या हालचाली यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, तसे राजन पाटील यांच्या गोटात काही नवं शिजतंय का, असा सवाल विचारला जात आहे. कारण गेल्या महिनाभरात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यालयातून राजन पाटील यांना फोन आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्यातील संवादाची माहिती मिळू शकलेली नाही.

एकीकडे राजन पाटील यांच्याशी संपर्काचा प्रयत्न होत असतानाच खासदार सुप्रिया सुळे ह्या नुकतेच इंदापूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्या वेळी आमदार यशवंत माने यांनी भिगवण ते बारामती असा खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून एकत्रित प्रवास केला. त्यांच्यातील चर्चेचा तपशील मिळू शकला नसला तरी माने यांनी मात्र सुप्रिया सुळे यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे स्पष्ट केले.

Supriya Sule-Yashwant Mane-Jayant Patil-Rajan Patil
VIDEO : तानाजी सावंत यांचं 'ते' विधान जिव्हारी, अजितदादांच्या 'NCP'तील नेत्यांनी वाभाडे काढले; महायुतीतून बाहेर पडणार?

एकंदरीतच अप्पर तहसील कार्यालयावरून उठलेले वादळ, राजन पाटील यांच्याशी जयंत पाटील यांच्या कार्यालयातून संपर्क साधण्याचा प्रयत्न आणि आमदार माने यांचा सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून एकत्रित प्रवास यामुळे मोहोळच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार की काय, असा सवाल विचारला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com