Devendra Fadnavis: यशवंतरावांच्या पुण्यतिथीला फडणवीस गैरहजर; सलग दुसऱ्या वर्षी प्रीतिसंगमाकडे पाठ, कऱ्हाडमध्ये नेमकं काय घडलं?

Yashwantrao Chavan Death Anniversary: यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीला CM देवेंद्र फडणवीस सलग दुसऱ्या वर्षी कऱ्हाडला गैरहजर. त्यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा.
Yashwantrao Chavan Death Anniversary News
Yashwantrao Chavan Death Anniversary NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 
  • यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावर नेत्यांची उपस्थिती.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग दुसऱ्या वर्षी अभिवादनासाठी गैरहजर.

  • फडणवीसांनी मुंबईतूनच अभिवादन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.

Karad Preetisangam: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी आज कऱ्हाडच्या प्रीतिसंगमावर हजेरी लावली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. सलग दुसऱ्या वर्षी फडणवीस पुण्यतिथीनिमित्त यशवंतरावांच्या समाधिस्थळी अभिवादनासाठी आलेले नाहीत.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज (बुधवारी) ४२ वी पुण्यतिथी आहे. दरवर्षी २५ नोव्हेंबरला कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावरील यशवंतरावांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून नेते कऱ्हाडमध्ये दाखल होतात. राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व असते.

Yashwantrao Chavan Death Anniversary News
Baramati Crime: विश्वास संपादन केला अन् विद्यार्थिनीवर अत्याचार; शिक्षकाला 20 वर्षांचा तुरुंगवास, 45 हजारांचा दंड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सलग दुसऱ्या वर्षी पुण्यतिथीच्या दिवशी प्रीतिसंगमावर अभिवादनासाठी आलेले नाहीत. मुंबईतूनच यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले जात असल्याने फडणवीस यांच्या कऱ्हाडमधील अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सलग दोन वर्षांच्या अनुपस्थितीमागचे कारण काय?

यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान कोणत्याही एका राजकीय पक्षापुरते मर्यादित राहिलेले नाही. राज्याच्या जडणघडणीतील त्यांचे योगदान लक्षात घेता विविध विचारधारांच्या पक्षांचे नेते प्रीतिसंगमावर अभिवादनासाठी येतात. त्यामुळे राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनीही पुण्यतिथीनिमित्त समाधिस्थळी उपस्थित राहावे, अशी यशवंतप्रेमींची अपेक्षा आहे.

Yashwantrao Chavan Death Anniversary News
Sunetra Pawar: रायगडमध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली; भाजप-शिवसेनेतील 100 पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

फडणवीस यांनी मुंबईतून यशवंतरावांना अभिवादन केले असले, तरी सलग दोन वर्षे पुण्यतिथीला ते कऱ्हाडमध्ये का आले नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या अनुपस्थितीमागचे नेमके कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.