Satara News : तो तर उद्धव ठाकरेंचा मुर्खपणा; मुख्यमंत्री पदासाठी पवारांचा हात धरला : राणेंचा टोला

Narayan Rane मंत्री नारायण राणे यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या समवेत जलमंदीर या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.
Udhav Thackeray, Narayan Rane
Udhav Thackeray, Narayan Ranesarkarnama
Published on
Updated on

Narayan Rane News : ज्यांनी स्वत: राजीनामा देऊन मुर्खपणा केला, त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा, म्हणणे मूर्खपणाचे आहे. निवडणुकीत मंगळसूत्र भाजपचे घातले आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांचा हात धरुन गेला. आता आम्हाला २०२४ पर्यंत आम्हाला वेळ आहे, असा टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी आज खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांच्या समवेत जलमंदीर या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री भागवत कराड, माजी आमदार आनंदराव पाटील आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर Udhav Thackeray निशाणा साधला.

नैतिकता असेल तर शिंदे, फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर मंत्री राणे यांना विचारले असता ते म्हणाले, ज्यांनी स्वत: राजीनामा देऊन मुर्खपणा केला, त्यांनी सरकारने राजीनामा द्या, म्हणणे मूर्खपणाचे आहे.

Udhav Thackeray, Narayan Rane
Simplicity of Mahesh Shinde: महेश शिंदेंचा साधेपणा.. पंगतीत बसून केलं जेवण...

निवडणुकीत मंगळसूत्र भाजपचे घातले आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांचा हात धरुन गेला. आता २०२४ पर्यंत आम्हाला वेळ आहे. त्यामुळे नैतिकता नसलेल्या माणसाने आमच्यावर बालू नये. गप्प घरातच बसावे, मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्या असे म्हणण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Udhav Thackeray, Narayan Rane
Satara Congress News : कर्नाटक निवडणुकीत भाजपला बजरंग बलीही वाचवणार नाही : नाना पटोले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com