Barshi Constituency : माझ्यामुळे तुझी प्रॉपर्टी राहिलीय, नायतर सावंतांकडे गहाण पडली असती; राजेंद्र राऊतांचा ओमराजेंवर पलटवार

Rajendra Raut Vs Omraje Nimbalkar : रवी सर (रवींद्र गायकवाड) आणि ओमराजेंमध्ये 2014 च्या निवडणुकीत कॉम्पिटिशन सुरु होतं. त्यावेळी ह्याला मी पत्र दिलं आणि लेखी हमी घेतली, त्यावेळेस हा 2014 ला खासदार झाला.
Rajendra Raut - Omraje Nimbalkar
Rajendra Raut - Omraje Nimbalkar Sarkarnama
Published on
Updated on

Barshi, 08 November : तुला विधानसभा मी दाखवली. तू तुझं तोंड बंद कर; कारण तुझं लफडं माझ्या एवढं कोणालाच माहिती नाही. तू किती चालीचा आहे, हे मला माहितीय. या राज्यात माझ्याएवढं तुला कोणीच ओळखत नाही. मला राजा राऊत म्हणतात, तू माझा नाद करू नकोस. तुझी जी प्रॉपर्टी राहिलीय, ती राजाभाऊ राऊतांमुळे राहिलीय. नायतर तानाजी सावंतांकडे गहाण पडली असती, अशा शब्दांत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर पलटवार केला.

बार्शी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांची आघळगाव येथे जाहीर सभा झाली. त्या सभेत बोलताना आमदार राऊत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आरोपांचा समाचार घेतला. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात सहा नंबरची प्रॉपर्टी असणारा आणि ती प्रॉपर्टी हाणणारा लबाड लांडगा (दिलीप सोपल) तू जनतेच्या डोळ्यात धूळ फेकायला लागला. तू त्या खासदाराच्या (ओमराजे निंबाळकर) वळणावर गेला का..?

मी लोकसभेत रात्रंदिवस फिरत होतो, तरी तुम्ही त्यांना 54 हजारांचा लीड दिलात. जो मला थोरला भाऊ म्हणत होता, तो माझा होऊ शकला नाही, तो तुमचा कधी होणार आहे. तुम्हाला वाटतंय फोन करतंय फोन करतंय, पण लय बरागंड्याचं लेकरू आहे ते... तू बाळा इवळूइवळू केळं खाल्लेत, तुला पुढच्यावेळेस कसं गाजर दाखवायचंय ते दाखवतो.. मला राजा राऊत म्हणतात, तू माझा नाद करू नकोस, अशा शब्दांत आमदार राजेंद्र राऊत यांनी ओमराजे निंबाळकरांना (Omraje Nimbalkar) चॅलेंज दिले.

राजेंद्र राऊत म्हणाले, तुला विधानसभेत कसं जायचं, हे मी शिकवलं. विधानसभा मी तुला दाखवली. खासदारकीला तानाजी सावंत यांचा मला फोन आला आणि उद्धवसाहेब मला बोलले की, राजाभाऊ तू जर मला पत्र दिलं तर मी आमेराजेला तिकीट देईन.

Rajendra Raut - Omraje Nimbalkar
Shinde Vs Thackeray : महाआघाडीलाच तुमचा चेहरा चालत नाही, महाराष्ट्राला कसा चालेल?; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

रवी सर (रवींद्र गायकवाड) आणि ओमराजेंमध्ये 2014 च्या निवडणुकीत कॉम्पिटिशन सुरु होतं. त्यावेळी ह्याला मी पत्र दिलं आणि लेखी हमी घेतली, त्यावेळेस हा 2014 ला खासदार झाला.. आता इथं नौटंकी करून माझ्या नावाने ओरडतोय..

तू तुझं तोंड बंद कर; कारण तुझं लफडं माझ्या एवढं कोणालाच माहिती नाही. तू किती चालीचा आहे, हे मला माहितीय. या राज्यात माझ्याएवढं तुला कोणीच ओळखत नाही. तुझी जी प्रॉपर्टी राहिलीय, ती राजाभाऊ राऊतामुळे राहिलीय. नायतर तानाजी सावंतांकडे गहाण राहिली असती, असेही राऊत यांनी नमूद केले.

तू माझ्या नादी लागू नको. उकाळ्यापाकाळ्या काढायला लागलो तर पळताभुई थोडी होईल आणि तोंडाला डांबर लागेल तुझ्या, एवढ्या दुर्घटना तुझ्या आहेत. माझ्या नादी लागू नको, मी तुला चॅलेंज देतो, अशा शब्दांत राऊतांनी ओमराजेंना आव्हान दिले.

Rajendra Raut - Omraje Nimbalkar
Barshi Constituency : डीसीसी बॅंक लुटून 320 कोटींचा घपला करणाऱ्याला निवडून देणार का?: मुख्यमंत्र्यांचा सोपलांवर हल्लाबोल

तो काय नाटके करतो हे चव्हाट्यावर आणलं, तर बायका चप्पलाने मारतील त्याला, त्यामुळे औकातीत राहा आणि पुढच्या निवडणुकीत तू येच, तू हाय आणि मी हाय. कळलं का तुम्हाला सपाच्या पिल्लाला दूध पाजल्यावर काय होतंय ते.. हे सापाचं पिल्लू आहे, ते आम्हाला ढसतंय तर तुम्हाला ढसणार नाही का..? असा सवालही राजेंद्र राऊतांनी जनतेला विचारला.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com