Satara ZP : शिवेंद्रराजे-उदयनराजेंकडे उमेदवारीसाठी रांगा; भाजपकडे डाळ न शिजणाऱ्या इच्छुकांना शशिकांत शिंदेंचा आधार

Satara ZP : लिंब गट सर्वसाधारण झाल्याने राजकीय वातावरण तापले; इच्छुकांच्या हालचाली गतिमान; 'राजे' समर्थकांचा कस लागणार; बंडखोरी टाळण्याचे नेत्यांपुढे आव्हान
Shivendrasinhraje and MP Udayanraje Bhosale face pressure over candidate selection, while rejected BJP aspirants may shift towards MLA Shashikant Shinde’s NCP faction
Shivendrasinhraje and MP Udayanraje Bhosale face pressure over candidate selection, while rejected BJP aspirants may shift towards MLA Shashikant Shinde’s NCP faction
Published on
Updated on

Satara News : सातारा तालुक्यातील लिंब जिल्हा परिषद गटासह लिंब व कोंडवे हे दोन्ही गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. गटासह या दोन गणांतून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गावोगावी कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. या तिन्ही ठिकाणी उमेदवार देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांचा कस लागणार आहे; पण इच्छुकांना आमदार शशिकांत शिंदे यांच्या राष्ट्रवादीचा आधार राहणार आहे.

पूर्वी हा शाहूपुरी गट होता. त्‍यात शाहूपुरी व कोंडवे गण होता. यामध्ये बदल होऊन शाहूपुरी नगरपालिकेत समावेश झाल्यामुळे कोंडवेपुढील गावे किडगाव गणात गेली आहेत. आता नव्या रचनेत लिंब गट झाल्याने लिंब व कोंडवे गण झाला आहे. लिंब गट हा पारंपरिकपणे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा बालेकिल्ला मानला जातो. लिंब गणात लिंब, नागेवाडी कुशी, नेले-किडगाव, पिंपळवाडी, धावडशी, कळंबे, चिंचणी आदी गावे आहेत, तर कोंडवे गणात कोंडवे, सैदापूर, इंगळेवाडी, गवडी, कण्हेर, आंबेदरे, वेळेकामथी या गावांचा समावेश आहे.

लिंब गटावर मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे वर्चस्व असले तरी काही गावांवर खासदार उदयनराजे भोसले यांचीही मजबूत पकड आहे. दोन्ही राजेंचे समर्थक कार्यकर्ते या भागात सक्रिय असल्याने त्यांच्यातील समन्वय हा आगामी निवडणुकीचा प्रमुख मुद्दा असेल. पूर्वी हा गट जावळी विधानसभा मतदारसंघात होता, त्यामुळे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचाही प्रभाव काही गावात जाणवतो. लोकसभा निवडणुकीत त्यांना या भागातून चांगली मते मिळाली होती. त्यामुळे त्यांचीही भूमिका निर्णायक ठरू शकते.

Shivendrasinhraje and MP Udayanraje Bhosale face pressure over candidate selection, while rejected BJP aspirants may shift towards MLA Shashikant Shinde’s NCP faction
Shivendra Raje Bhosale: बँकेचे अध्यक्ष ते आमदार..! शिवेंद्रराजे भोसले यांचा राजकीय प्रवास

साधारणत: ४५ हजार मतदार असलेल्या या गटात सध्या भाजपचे तालुकाध्यक्ष महेश गाडे, खासदार उदयनराजेंचे समर्थक लक्ष्मण कडव, बाळासाहेब चोरगे, पैलवान नीलेश पाटील, नामदेवराव सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप चव्हाण, माजी सभापती सरिता इंदलकर, माजी सरपंच ॲड. अनिल सोनमळे, संभाजी इंदलकर, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव सावंत, दिलीप निंबाळकर, बाळासाहेब ननावरे, इंद्रजित ढेंबरे, दादासाहेब बडदरे, महेश पाटील आदींची नावे चर्चेत आहेत.

लिंब गणात ॲड. विजय इंदलकर, दत्तात्रय पाटील, उमेश फाळके, धर्मेंद्र सावंत, प्रभाकर पवार यांच्या नावाची चर्चा आहे. कोंडवे गणात माजी सभापती धर्मराज घोरपडे, एकनाथ इंगळे, विश्वजित लाड, संजीवनी धनवे, गणेश निंबाळकर, दादासाहेब बडदरे, संभाजी इंदलकर, मच्छिंद्र गोगावले, धैर्यशील पवार यांची नावे पुढे येत आहेत. लिंब गट व दोन्ही गण खुले झाल्याने उमेदवार निश्चित करताना नेत्यांची मोठी कसोटी लागणार आहे.

Shivendrasinhraje and MP Udayanraje Bhosale face pressure over candidate selection, while rejected BJP aspirants may shift towards MLA Shashikant Shinde’s NCP faction
Satara Politic's : उदयनराजेंसोबत एकत्र येण्याबाबत शिवेंद्रराजेंचे मोठे विधान : ‘आम्ही दोघंही भाजपमध्ये...’

काही इच्छुकांना तिकीट न मिळाल्यास ते स्वबळावर लढण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर काहीजण अजूनही ‘बाबाराजे म्हणतील तेच, ’ या भूमिकेवर ठाम आहेत; पण उमेदवारीसाठी दोन्ही राजेंसोबतच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाही पर्याय येथील इच्छुकांपुढे आहे. सध्या सर्व खुले असल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. कोणाला उमेदवारी मिळणार? यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यासाठी नेत्यांचा मात्र कस लागणार आहे.

इकडे नाही, तर तिकडे आहेच :

लिंब गटासह गणातून उमेदवारी मिळवण्यासाठी आता कार्यकर्त्यांची मोठी रस्सीखेच होणार आहे. इच्छुकांची संख्या वाढल्याने काहींच्या नजरा या महाविकास आघाडीच्या उमेदवारीकडेही आहेत. त्यामुळे ‘इकडे नाही जमले, तर तिकडे आहेच’ असे धोरण काहींनी ठेवले आहे. गटातील लिंब व कोंडवे हे दोन्ही गण खुले झाल्याने स्थानिक पातळीवर चुरशीची स्पर्धा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com