

Pune ZP Teachers News : पुणे जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात आल्यानंतर आता धक्कादायक प्रकार घडकीस आला आहे. तर बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे बदली आणि इतर प्रशासकीय सवलती मिळवणाऱ्या ४१ शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
या शिक्षकांचे दिव्यांगत्वाच्या आधारे मिळणारे सर्व शासकीय लाभ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पाच शिक्षकांची विभागीय चौकशी करण्यात आल्याची माहिती देखील आता समोर आली असून, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा परिषदेने दिव्यांग असल्याची बोगस प्रमाणपत्रे सादर केलेल्या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. अशा दिव्यांग प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीमध्ये ४१ प्राथमिक शिक्षक अपात्र असल्याचे समोर आले आहे. तर या शिक्षकांचे दिव्यांगत्व हे ४० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे या ४१ प्राथमिक शिक्षकांनी बदली, पदोन्नती, वाहन भत्ता, व्यवसाय करातील सवलत आदी शासकीय लाभ घेतल्याचेही समोर आले आहे. यावरून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
या शिक्षकांचे दिव्यांगत्वाच्या आधारे मिळणारे सर्व शासकीय लाभ स्थगित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिले आहेत. तसेच, पाच शिक्षकांची विभागीय चौकशी करण्यात आल्याची माहिती देखील मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांच्या फेरपडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यानुसार, आत्तापर्यंत १७८ कर्मचारी पुनर्पडताळणीसाठी ससून सर्वोपचार रुग्णालय तसेच पुणे मंडळाच्या उपसंचालकांकडे पाठविण्यात आले होते.
त्यापैकी उपसंचालकांकडून फेरपडताळणीचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. याआधारे शिक्षकांकडून त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे कोणते प्रशासकीय लाभ घेतले, याची माहिती मागविण्यात आली होती. तसेच, ४० टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व आढळलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.