
Mumbai News : महाविकासआघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना अडवकण्याचा कट रचण्यात आला होता. फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवा, अशी एक कथित ऑडिओ क्लिप सभागृहात सादर करण्यात आली होती.
या प्रकरणानंतर भाजप (BJP) आमदार प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी चौकशी नेमावी, अशी मागणी केली होती. आता दरेकर यांची ही मागणी मान्य करण्यात आली असून राज्य सरकारकडून चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
यात एसीपी सरदार पाटील एका अज्ञात व्यक्तीशी बोलत असून त्यात ते परमबीर सिंह आणि संजय पुनामिया यांच्यार गुन्हा दाखल करून फडणवीस-शिंदे यांना अडकवण्याचे षडयंत्र रचत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणानंतर प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी चौकशी नेमावी, अशी मागणी केली होती. आता प्रवीण दरेकर यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या गृह विभागाने एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकात एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याबद्दल नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात पोलीस उपमहानिरिक्षक राजीव जैन, पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे आणि सहायक पोलीस आयुक्त आदिकराव पोळ यांचा समावेश असणार आहे. या विशेष तपास पथकाने चौकशीची कार्यवाही त्वरित पूर्ण करुन त्याचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना अडवकण्याचा कट रचल्याच्या चौकशीसाठी ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी गठीत केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे
ठाणे पोलीस आयुक्तालय या ठिकाणी असलेले पोलीस अधिकारी यांनी पदाचा दुरुपयोग करुन फेरतपासणी करुन फसवणूक केली, अशा आशयाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. या विशेष तपास पथकाने चौकशीची कार्यवाही त्वरित पूर्ण करुन त्याचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.