Beed Police : बीडच्या पोलीस अधिक्षकांची मोठी कारवाई, दोन पोलिसांचे निलंबन; काय आहे प्रकरण ?

Beed Police Superintendent Action News : बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफिया, खंडणी अशा गुन्ह्यांची चर्चा आहे. त्यातच वाळू माफियांचा मुद्दा देखील चांगलाच तापलेला पाहायला मिळत आहे.
Beed Police  .jpg
Beed Police .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील एक आरोपी वगळता अन्य सर्व आरोपीना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी वाल्मिक कराडसह आठ आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यानंतर नवनीत कांवत यांच्याकडे बीडच्या पोलीस अधिक्षकपदाची जबाबदारी दिली होती.नवनीत कावंत यांनी तपासाची सूत्रे हाती घेताच मोठी कारवाई केल्याचे पाहायला मिळत आहे. आता त्यांनी वाळू माफियांना मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी त्यांनी गेवराई पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.

Beed Police  .jpg
Eknath Shinde Shivsena : 'ऑपरेशन टायगर' सुरू? माजी आमदार धंगेकर, बाबर, मोकाटे शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाणार..?

बीड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफिया, खंडणी अशा गुन्ह्यांची चर्चा आहे. त्यातच वाळू माफियांचा मुद्दा देखील चांगलाच तापलेला पाहायला मिळत आहे. त्यानंतर अवैध वाळू उपसा केल्याच्या प्रकरणातील आरोपींशी साटेलोटे करणाऱ्या बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केली. गेवराई पोलीस (Police) ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार आणि पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांचा यामध्ये समावेश आहे.

Beed Police  .jpg
Ajit Pawar politics: नरेंद्र पाटील यांनी मुंडे प्रकरणात अजित पवारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले!

अवैध वाळू उपसा केल्या प्रकरणात आरोपींसोबत साटेलोटे करणाऱ्या बीडच्या पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांनी ही कारवाई केली. बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कावंत यांनी ही कारवाई केली. गेवराई पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बलराम सुतार, पोलीस हवालदार अशोक हंबर्डे यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Beed Police  .jpg
Pankaja Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरील प्रतिक्रियेनंतर पंकजा मुंडेंचे मोठे विधान; म्हणाल्या,'मी फक्त तुमचं...'

सहाय्यक फौजदार बलराम सुतार, पोलीस हवालदार अशोक हंबर्डे या दोघांनी वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाईचे आदेश असताना वाळूसह गाडी ताब्यात न घेता फक्त वाहन ठाण्यात आणून लावले. त्याशिवाय गुन्हा दाखल करण्यास देखील विलंब केला. हा प्रकार म्हणजे आरोपींना सहकार्य करण्यासारखा होता. यामुळे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी बलाराम सुतार आणि अशोक हंबर्डे या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन केले.

Beed Police  .jpg
NCP District President : स्थानिकांना डावलून जयंतरावांनी माजी आमदाराला केलं जिल्हाध्यक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com