Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होणार? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचे संकेत

Petrol-Diesel Price Hike: देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याचे संकेत आता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी दिले आहेत, त्यामुळं नागरिकांना येत्या काळात प्रचंड महागाईचाही सामना करावा लागू शकतो.
RBI governor sanjay malhotra
RBI governor sanjay malhotra Sarkarnama
Published on
Updated on

Petrol-Diesel Price Hike: देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याचे संकेत आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी दिले आहेत, त्यामुळं नागरिकांना येत्या काळात प्रचंड महागाईचाही सामना करावा लागू शकतो. पण जागतीक स्तरावर आणि देशाच्या आर्थिक स्थितीबाबत नेमके काय बदल होत आहेत? याबाबतही त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.

RBI governor sanjay malhotra
Gold demand in India : सोने खरेदीत भारतीय जगात भारी! 'या' राज्यात होते सोन्याची सर्वाधिक विक्री? आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

गव्हर्नर नेमकं काय म्हणाले?

इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं की, मंगळवारी स्वित्झर्लंडमध्ये स्वीस नॅशनल बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंडच्या एका पत्रकार परिषदेत मल्होत्रा यांनी सांगितलं की, जर सध्याची परिस्थिती पुढे बऱ्याच काळापासून अशीच राहिली तर काही दिवसांतच सरकार किंमतींमध्ये वाढ करेल. कारण सरकारनं उत्पादन शुल्क आधीच कमी केलेलं आहे. सरकारी इंधन रिटेलर्समध्ये सध्या किंमतींवरुन संघर्ष सुरु आहे कारण ते सध्या कच्च्या तेलांच्या वाढत्या किंमतींचा समना करत आहेत.

RBI governor sanjay malhotra
Ambadas Danve : मतीनच्या घरावर बुलडोझर, अंबादास दानवे म्हणतात, युपी-बिहारची संस्कृती महाराष्ट्रात येऊ देणार नाही!

हॉर्म्युजची सामुद्रधुनी बंद असल्याकारणानं भारताच्या ऊर्जा पुरवठा साखळीत अडथळे अधिक गंभीर झाले आहेत. त्यामुळं आपल्याजवळ आता लवचिक महागाईवर लक्ष केंद्रीत करायचं फ्रेमवर्क आहे पण अशा स्थितीत हे पुरेसं ठरणारं नाही. जर पुरवठ्यातील अडथळे इतके मोठे असतील तर फिस्कल कोऑर्डिनेशन खूपच गरजेचं होऊन जातं.

RBI governor sanjay malhotra
Modi government decision : सोने-चांदीवरील आयात शुल्क वाढीमागे मोदी सरकारचा मोठा डाव? अर्थकारण समजून घ्या...

दरम्यान, यापूर्वी पीटीआय या वृत्तसंस्थेनं सरकारी सुत्रांच्या हवाल्यानं सांगितलं होतं की, लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींच्या वाढ टाळली जाऊ शकत नाही. आधीच सरकारी तेल कंपन्यांनी वाढत्या इनपूट खर्चामुळं व्यवसायिक एलपीजी, उद्योगांसाठीच्या डिझेल आणि ५ किलोच्या एलपीजी सिलेंडर आणि आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सच्या विकलं जाणाऱ्या जेट इंधनाच्या किंमती वाढवल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशवासियांना पेट्रोलियम पदार्थ आणि सोन्यावरील खर्च कमी करण्याचं अपील केलं आहे. कारण भारताच्या घटत्या परदेशी चलनावरील (Forex Reserve) दबाव कमी केला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com