Phaltan doctor death update : फलटण प्रकरणात डॉ. धुमाळांकडूनच मोठा खुलासा; चौकशी समितीच्या अहवालानंतर ‘ते’ प्रकरण तिथंच संपलं होतं...

Dr. Dhumal’s Major Revelation in the Phaltan Suicide Case : आरोपी रुग्णांना रुग्णालयात तपासणीसाठी आणल्यानंतर संबंधित डॉक्टर महिला सहकार्य करत नव्हत्या, फिट किंवा अनफिटचे प्रमाणपत्र लवकर देत नव्हत्या, अशी तक्रार पोलिसांनी केली होती.
Phaltan female doctor suicide case; investigation details and past inquiry report discussed.
Phaltan female doctor suicide case; investigation details and past inquiry report discussed.Sarkarnama
Published on
Updated on

Phaltan investigation : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर दररोज नवनवे खुलासे येत आहेत. महिला डॉक्टरने चौकशी समिती तसेच पोलिसांना लिहिलेल्या पत्रामध्ये अनेक धक्कादायक आरोप केले होते. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. आता आणखी एक नवा खुलासा समोर आला आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर संबंधित महिला डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या होत्या, ते प्रकरण तिथंच संपलं होतं, असा दावा करण्यात आला आहे.

पीडित महिला डॉक्टर कार्यरत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधिक्षक डॉ. धुमाळ यांनीच एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा दावा केला आहे. पीडितेने डॉ. धुमाळ यांच्या नावाचाही चौकशी समितीला लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला आहे. पण डॉ. धुमाळ यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सर्व दावे फेटाळून लावले आहे. याबाबत आपल्याकडे त्यांनी कोणतीही तक्रार केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आरोपी रुग्णांना रुग्णालयात तपासणीसाठी आणल्यानंतर संबंधित डॉक्टर महिला सहकार्य करत नव्हत्या, फिट किंवा अनफिटचे प्रमाणपत्र लवकर देत नव्हत्या, अशी तक्रार पोलिसांनी केली होती. त्या तक्रारीनंतर आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमली होती. या समितीकडे पीडितेने लेखी खुलासा दिला होता. त्यामध्ये पीडितेने पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते. आपल्यावर चुकीचे प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप तिने केला होता.

Phaltan female doctor suicide case; investigation details and past inquiry report discussed.
PM Narendra Modi : भाजपचा फर्जीवाडा, मोदींसाठी तयार केली ‘नकली यमुना’! Video दाखवत धक्कादायक दावा...

याबाबत बोलताना डॉ. धुमाळ म्हणाले, ‘चौकशी समितीच्या अहवालानंतर आम्ही महिला डॉक्टरांना सूचना दिल्या दिल्या. त्यानंतर ते प्रकरण तिथंच संपलं होतं.’ चौकशी अहवालामध्ये नेमके काय होते, त्यांना काय सूचना दिल्या, याबाबत मात्र त्यांनी माहिती दिली नाही. पोलीस निरीक्षक आरोपी रुग्णालयात येऊन धमकी देत असल्याचा पीडितेने केलेल्या आरोपांवर बोलताना धुमाळ यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

Phaltan female doctor suicide case; investigation details and past inquiry report discussed.
Phaltan Doctor death case : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राहुल गांधी आक्रमक; पत्रातील ‘त्या’ उल्लेखावरून दिले मोठे संकेत

पीडितेने चौकशी समितीला दिलेल्या पत्रातील आरोपांबाबत नकारार्थी उत्तरे दिली. त्यांनी याबाबत आपल्याकडे काहीही लेखी तक्रार नसल्याचे किंवा आपल्याला त्यांनी सांगितले नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत आणखी खुलासे समोर येऊ शकतात. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com