

ज्ञानेश्वर भंडारे
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकपदी कोणाला संधी मिळणार, याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. नावांवर एकमत होणार की नाही याविषयी चर्चा होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनंतर नावे निश्चित झाली आहेत. भाजपकडून सात जणांना संधी मिळाली असून भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांची नावे महापौर रवी लांडगे यांनी जाहीर केली आहे.
भाजपकडून सचिन साठे, जयनाथ काटे, विशाल कलाटे, कुणाल लांडगे, राजेश पिल्ले, कुलदीप परांडे, ऋषिकेश म्हेत्रे यांना संधी देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून फजल शेख, राजेंद्र जगताप, सीमा सावळे यांना संधी मिळाली आहे.
राष्ट्रवादीने अनुभवी नेत्यांना संधी दिली आहे. महापालिका निवडणुकीत सीमा आवळे यांचा पराभव झाला होता. मात्र, त्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आहेत. त्यांचा अनुभव आणि आक्रमक राजकारण पाहता त्यांना संधी देण्यात आल्याची चर्चा आहे. तर, राजेंद्र जगताप हे देखील माजी नगरसेवक आहेत. फजल शेख हे शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहेत.
भाजपने राजकीय समीकरण साधले
पिंपरी-चिंचवड महापालिकेत पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे कोण कोणत्या नेत्यांना स्वीकृती संधी द्यायची याबाबत भाजपमध्ये चर्चा होती. मात्र, पिंपरीतून दोन, भोसरीतून दोन आणि चिंचवडमधून तीघांना संधी देत राजकीय गणित साधण्यात आले.
भोसरी विधानसभा ऋषिकेश म्हात्रे, कुलदीप परांडे यांना तर, चिंचवड मतदारसंघातून विशाल कलाटे, सचिन साठे, जयनाथ काटे तसेच पिंपरीमधून राजेश पिल्ले, कुणाल लांडगे यांना संधी देण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.