Fact Check: PM किसान योजनेत वर्षाला मिळणार 10 हजार रुपये? व्हायरल मेसेजमागचं काय आहे सत्य!

PM Kisan Yojana मध्ये वर्षाला 10,000 मिळणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. पीएम किसान योजनेतील सध्याची रक्कम आणि या व्हायरल दाव्यामागचं सत्य जाणून घ्या.
PM kisan Yojana
PM kisan Yojana Sarkarnama
Published on
Updated on

PM Kisan Yojana : अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबत सोशल मीडियावर सध्या एक दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीएम किसान योजनेची वार्षिक रक्कम 6 हजार रुपयांवरून थेट 10 हजार रुपये करण्यात येणार असल्याचे या मेसेजमध्ये सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या दाव्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळे आहे.

पीएम किसान योजनेची रक्कम खरंच वाढणार?

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेची रक्कम वाढवून दरवर्षी 10 हजार रुपये करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. PM Kisan Yojana च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरूनही या व्हायरल दावा करण्यात आले आहे. अधिकृत हँडलवर या दाव्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे,

PM kisan Yojana
Manoj Jarange Mumbai Protest : जरांगे मुंबईसाठी रवाना! पाटलांसाठी खास गाडी अन् ताफा तयार, पाहा Exclusive अपडेट्स

पीएमकिसान योजनेअंतर्गत वार्षिक 10,000 मिळण्याबद्दलच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्यांपासून सावध रहा! व्हायरल दावा: वार्षिक 10,000 खरी माहिती: पात्र शेतकरी कुटुंबांना वार्षिक 6,000 तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. अचूक माहितीसाठी केवळ अधिकृत सरकारी स्रोतांवरच विश्वास ठेवा.

म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत सध्या पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम एकाच वेळी न देता 3 समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये दिले जातात.

24वा हप्ता कधी मिळणार?

दरम्यान, PM Kisan Yojana च्या 24व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख केंद्र सरकारकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे 24वा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार, याबाबत सध्या निश्चित माहिती उपलब्ध नाही.

PM kisan Yojana
Raj Thackeray Post : राज ठाकरेंच्या एका 'म्हणी'ने उठणार राजकीय वादळ; अमित शाह मुंबईतून परतताच केलेले सूचक विधान चर्चेत

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

PM Kisan Yojana संदर्भातील कोणताही मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर लगेच विश्वास ठेवू नये. विशेषतः हप्त्याची रक्कम वाढणे, हप्ता जमा होण्याची तारीख किंवा योजनेतील नवीन नियम याबाबतची माहिती केवळ अधिकृत सरकारी माध्यमांवरूनच तपासावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com