BJP Politics : प्रज्ञा सातवांचा राजीनाम्याने मोठा ट्विस्ट, काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद हुकणार! भाजपचे एक दगडात दोन पक्षी...

Pragya Satav Resignation Congress : विधान परिषदेच्या आमदारकीचा प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला आहे. त्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
BJP VS Congress
BJP VS CongressSarkarnama
Published on
Updated on

Congress News : विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज आपला राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सुपूर्द केला. त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसची विधान परिषदेतील सदस्य संख्या सहावर आली आहे. सातव यांच्या राजीनाम्यातून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे.

काँग्रेस विधीमंडळ पक्षाने विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांचे नावाची शिफारस केली आहे. मात्र, आता काँग्रेसची सदस्यसंख्या झाली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सदस्यसंख्या देखील सहा आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळणार याचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेची सदस्या संख्या 78 आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी आठ सदस्य असलेला पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते. मात्र, विधान परिषदेतील तब्बल 22 जागा रिक्त आहेत. त्यामुळे आठ पेक्षा कमी सदस्य असताना देखील विरोधी पक्षनेते पद मिळण्याची वर्तवली जात आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समान सदस्य विरोधी पक्षनेतेपदासाठी दोघांमध्ये रस्सीखेंच होण्याची शक्यता आहे.

BJP VS Congress
Manikrao Kokate politics: छगन भुजबळ यांना टार्गेट करता करता माणिकराव कोकाटे स्वतःच झाले हिट विकेट!

राजीनाम्याचे टायमिंगची चर्चा

प्रज्ञा सातव यांच्या आमदाराकीची तब्बल पाच वर्ष शिल्लक असताना त्यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामागे भाजपच्या रणनीतीची चर्चा होत आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सातव यांनी राजीनामा दिल्याने विरोधी पक्ष कमकुवत असल्याचे संदेश मतदारांमध्ये पोहोचवण्यात आला आहे. तसेच विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचे सुरू असलेले प्रयत्नामध्ये अडथळा निर्माण करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

BJP VS Congress
Manikrao Kokate politics: छगन भुजबळ यांना टार्गेट करता करता माणिकराव कोकाटे स्वतःच झाले हिट विकेट!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com