MLA Pradnya Satav News
MLA Pradnya Satav NewsSarkarnama

Pragya Satav Resign : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार?

Pragya Satav Congress Vs BJP : काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी विधीमंडळात आल्या आहेत.
Published on

Pragya Satav join BJP : काँग्रेसचे एकनिष्ठ घराणे म्हणून सातव घराणे परिचित होते. मात्र, विधान परिषदेच्या काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी विधीमंडळ परिसरात आल्या आहेत. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेण्यासाठी विधीमंडळात आल्या होत्या. त्यांनी आपला राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सुपूर्द केला.

राजीनाम्यानंतर त्या थेट भाजप कार्यालयात जाणार असून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. बुधवारी त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त होते. मात्र, काँग्रेस नेत्यांनी त्यांची समजूत काढल्याने त्यांनी यूटर्न घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र, आज त्यांनी विधान परिषदेच्या अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला.

प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा कार्यकाळ हा 2030 पर्यंत होता. त्या 2024 मध्ये त्या विधान परिषदेवर गेल्या होत्या. मात्र, पाच वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना त्यांनी थेट राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

MLA Pradnya Satav News
PMC ELection: ठरलं! पुण्यातही भाजप-शिंदे सेनेची युती; मुंबईचे नेते आज पुण्यात फार्मूला ठरवणार

त्यांचे पती माजी खासदार राजीव सातव हे राहुल गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी दिली होती. सलग दुसऱ्यांदा विधान परिषदेवर संधी देऊनही स्थानिक राजकारणाचा विचार करून त्यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला.

MLA Pradnya Satav News
Shivsena News: तनवाणींच्या दबावतंत्रानंतर संजय शिरसाटांची खेळी! तनवाणींसह जैन यांचा मुख्य समन्वय समितीत समावेश!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com