Pradnya Satav Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांचा सूर बदलला, काँग्रेस सोडण्याची तीन मोठी कारणं सांगितलं

Pradnya Satav Join BJP Resignation Congress : विधान परिषदेच्या आमदारकीचा प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला आहे. त्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Pradnya Satav Join BJP
Pradnya Satav Join BJPsarkarnama
Published on
Updated on

Pradnya Satav News : काँग्रेस विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या आमदरकीचा राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सुपूर्द केला. या राजीनाम्यानंतर अवघ्या दीड ते दोन तासांत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महासूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.

भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडण्याचे आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याची तीन मोठी कारणं सांगितली, त्या म्हणाल्या की, राजीव सातव यांनी जे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महाराष्ट्राचा जो विकास होत आहे त्यामध्ये देवाभाऊंना हातभार लावण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

प्रज्ञा सातव या 2024 मध्ये काँग्रेसकडून विधान परिषदेवर आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ 2030 पर्यंत आहे. मात्र, त्यांनी अचानक राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधान परिषदेमधील काँग्रेसचे संख्याब देखील कमी झाले असून त्यांचा विरोधी पक्षनेतेपदावरील दावा सुद्धा कमकुवत झाल्याते सांगितले जात आहे.

Pradnya Satav Join BJP
Pradnya Satav : 'हात' सोडून 'कमळ' हातात! काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रज्ञा सातव यांचा असा आहे राजकीय प्रवास!

काँग्रेसला खिंडार

प्रज्ञा सातव यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशाच्या वेळी सातव म्हणाल्या की, अजून खूप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे. त्यासाठी वरिष्ठांनी तारीख द्यावी त्या तारखेला भव्य कार्यक्रम घेत हा पक्ष प्रवेश घडवून आणू.

Pradnya Satav Join BJP
BJP Politics : प्रज्ञा सातवांचा राजीनाम्याने मोठा ट्विस्ट, काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद हुकणार! भाजपचे एक दगडात दोन पक्षी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com