Prahlad Joshi News : देशभरात गाजत असलेल्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या तीव्र आंदोलनांनंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी अधिकृतपणे शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला आहे.
प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या असलेल्या ग्राहक संरक्षण मंत्रालयासोबतच आता शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रल्हाद जोशी यांनी सावध पवित्र घेतला. ते म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर विश्वास दाखवून ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. ही नवी भूमिका मी पूर्ण गांभीर्याने आणि समर्पणाच्या भावनेने पार पाडेन.'
दिवसभरात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या विविध बैठकांचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, 'शिक्षण मंत्रालय हा माझ्यासाठी एक नवीन विषय आहे. त्यामुळे सध्या मी कोणत्याही विषयावर घाईघाईत भाष्य करू इच्छित नाही.'
मंत्रालयाचे सर्व विभाग, सध्या सुरू असलेल्या योजना आणि एकूण कामकाजाची सविस्तर माहिती घेणे ही माझी पहिली प्राथमिकता आहे. शिक्षण हे देशातील सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक असल्याने, संपूर्ण कार्यपद्धती समजून घेतल्यानंतरच मी पुढील धोरणात्मक निर्णयांवर सविस्तर बोलेन."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.