Prajakta Mali News : अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह काही अभिनेत्रींची नावे घेत सुरेश धस यांनी परळी पॅटर्नचा उल्लेख केला होता. सोशल मीडियावर यावरून प्राजक्ता माळी यांना ट्रोल केले जात होते. प्राजक्त माळी यांनी सुरेश धस यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत महिला आयोगाकडे त्यांची तक्रार केली आहे. धस यांनी माफी मागावी, अशी मागणी देखील प्राजक्ता माळी यांनी केली आहे.
बीडमध्ये जे काय चाललं ते झाकण्यासाठी कलाकारांवर आरोप का करताय? महिला कलाकारांचे नाव घेता पुरुष कलाकार परळीमध्ये आले नाहीत का? पुरुष कलाकारांची नावे का घेत नाही? कुत्सितपणे जे पद्धतीने ते महिला कलाकरांचे नाव घेत आहेत, अत्यंत घाणेरड्या पद्धतीने नावे घेतली. त्यांनी माफी मागावी, अशी माझी मागणी आहे, असे म्हणत प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांनी धू धू धुतले.
तुम्ही राजकारणी आहात आम्ही कलाकार आहोत. तुन्ही या सगळ्यात कलाकारांना का खेचताय, आमचा कलाकारांचा काय संबंध. तुम्ही महिलांची नावं घेतली स्वतःचा टीआरपीसाठी नावं घेतली. महिलांच्या कतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात, असे प्राजक्ता माळी सुरेश धस यांनी उद्देशून म्हणाल्या.
सुरेश धस यांच्यावर टीका करत असताना महिला स्वकृत्वाने उभी राहू शकत नाही का? कष्टाने मेहनतीने माणूस मोठा होऊ शकत नाही का? महिलांची अब्रू खास करून फिल्म इंडस्ट्रीत महिलांवर फार सॉफ्ट टार्गेट आहे का? कोणी यावं नाव घेऊन जावं, वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावाचा गैरवापर करू नका, असे म्हणताना प्राजक्ता माळी यांनी अश्रू अनावर झाले.
प्राजक्ता माळी म्हणाल्या, मी महिला आयोगाकडे त्यांची तक्रार केली आहे. त्यांनी माफी मागावी. मी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली असून एक दोन दिवसांत मला वेळ मिळेल. मी मुख्यमंत्र्यांना भेटून यावर ठोस कारवाई करावी, अशी विनंती करणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.