Nagpur violence : नागपूर दंगलीवर प्रकाश आंबेडकरांचा धक्कादायक दावा, "या कटात एक विषारी मंत्री"; कोणाकडे रोख?

Prakash Ambedkar On Nagpur violence : छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळला आहे. कबर हटवण्यावरून राजकीय वाद पेटला असतानाच नागपूर शहरातील महाल परिसरात दंगल उसळली.
Prakash Ambedkar On Nagpur violence
Prakash Ambedkar On Nagpur violenceSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद उसळला आहे. हिंदुत्ववादी संघटनांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांची मागणी कबर हटवण्याची आहे. अशातच हा वाद आणखी पेटला असून नागपूर शहरातील महाल परिसरात हिंसाचार झालाय. दोन गटांत झालेल्या दंगलीमुळे शहरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा करताना गंभीर आरोप करत केले आहेत. त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाना साधताना या दंगलीला एका मंत्री कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.

नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदाराने मोठा दावा करताना बाहेरून लोक आले होते असे म्हटलं होते. तर याप्रकरणावर विधानसभेत निवेदन सादर करताना पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला आहे, अशांना सोडणार नाही. तर कोणालाच कायदा हातात घेऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान आता प्रकाश आंबेडकर यांनी दंगलीच्या पार्श्वभूमीवर मोठा दावा करताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महायुती सरकारवर निशाना साधताना, "महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जातय", असाही दावा प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री नितेश राणे यांचे नाव न घेता केला आहे.

Prakash Ambedkar On Nagpur violence
Nagpur Violence : नागपुरात राड्यानंतर तणावपूर्ण शांतता, संचारबंदी लागू; पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन, 50 जण ताब्यात

तसेच आंबेडकर यांनी हे देखील स्पष्ट केले की, "हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. यामुळे नागपूरसह सर्व नागरिकांना आपण आवाहन करतो की, अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा." सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हालचालींमागे असलेल्या शक्तींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केलं आहे.

Prakash Ambedkar On Nagpur violence
Nagpur Violence : नागपुरात संचारबंदी लागू आता रस्तेही बंद? पोलिसांनी केली अधिसूचना जारी!

दरम्यान याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी थेट नितेश राणे, निलेश राणेंचं नाव घेत त्यांचा बोलवता धनी कोण? असा सवाल केला आहे. भास्कर जाधव यांनी, कोण नितेश राणे? नितेश राणे, निलेश राणेंचा बोलवता धनी कोण? नितेश राणेंच्या मागे एक संघटना आहे. एक व्यक्ती असं करु शकत नाही. यामध्ये संघटना आहे, सरकार आहे. महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा देखील भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com