Prakash Ambedkar : उद्धव ठाकरेंना फक्त 44 जागा मिळणार, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

Prakash Ambedkar Uddhav Thackeray Election:प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला की, काँग्रेसने असे ठरवले आहे की ते 150 पेक्षा कमी जागांवर लढणार नाहीत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा देखील 88 जागांवर लढण्यास ठाम आहे.
Prakash Ambedkar, Uddhav Thackeray
Prakash Ambedkar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar News : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. जागा वाटप लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती महाविकास आघाडीतील नेते करत आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या पक्षाला फक्त 44 जागा मिळणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना (यूबीटी) यांना फक्त 44 जागा मिळणार आहेत. कारण काँग्रेस कमी जागांवर लढणार नाही.

प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला की, काँग्रेसने असे ठरवले आहे की ते 150 पेक्षा कमी जागांवर लढणार नाहीत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा देखील 88 जागांवर लढण्यास ठाम आहे. त्यामुळे आपण विचार केला तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला फक्त 44 जागा मिळतील.

Prakash Ambedkar, Uddhav Thackeray
Ahmednagar Politics : खासदार लंके उखाण्यात कोणाचं नाव घेणार? पाटील 'एबी' फॉर्मवर सही करणार

पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांना विचारले की ते ते उद्धव ठाकरेंसोबत जाणार का? त्यावर प्रकाश आंबेडकरांनी कोणाबरोबर जाणार आहोत हे आम्ही आधीच सांगितले आहे. आदिवासींचे संघटन होत आहे, त्यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी जात आहे. विविध जिल्ह्यांमध्ये ओबीसींच्या काही संघटना आहेत. त्यांना बरोबर घेण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या आघाडीमध्ये ज्याला कोणाला यायचे असेल त्यांच्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत.

सर्वांसाठी दरवाजे खुले

प्रकाश आंबेडकर म्हणाले ज्यांना आमच्या आघाडीत यायचे आहेत त्यामध्ये भाजपला सोडून सर्वांसाठी आमचे दरवाजे खुले आहेत. आम्ही कोणासोबत जाणार नाही मात्र ज्यांना आमच्यासोबत यायचे आहे त्यांना आम्ही सोबत घेऊ.

Prakash Ambedkar, Uddhav Thackeray
Baban Shinde Arrested : 'सौ चूहे खा के बिल्ली चली..' ; महाराष्ट्रात तब्बल 300 कोटींचा घातला गंडा अन् मथुरेत जाऊन बनला साधू!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com