Prakash Ambedkar : 'मोदी, आनंदोत्सव कसला साजरा करताय? पहलगाम हल्ल्यातील आरोपी कुठेत?' प्रकाश आंबेडकरांचा सवाल

Pahalgam Attack Prakash Ambedkar PM Modi :पहलगाम हल्ल्यानंतर अजुनही हल्ला करणारे दहशतवादी सापडले नाहीत. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल केला आहे.
Prakash Ambedkar Narendra Modi
Prakash Ambedkar Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

Prakash Ambedkar News : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. त्यानंतर पाकिस्तान भारतामध्ये संघर्ष झाला. पाकिस्तानला दिलेल्या उत्तरानंतर भाजपकडून शहरांमध्ये तिरंगा रॅली काढत आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना आनंदोस्तव कसाल साजरा करताय? असा सवाल ट्विटरद्वारे विचारला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, 'पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजुनही सापडलेले नाहीत. मोदी, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे आहेत? एक महिना झाल आहे. तुम्ही आनंदोत्सव कसला साजरा करताय? हल्लात मारल्या गेलेल्या पीडितांच्या पत्नीना अजून न्याय मिळालेला नाही.'

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 भारतीय पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तामध्ये घुसून दहशतवादी अड्ड्यांना टार्गेट केले. यामध्ये 80 ते 90 दहशतवादी मारले गेल्याचे मिडिया रिपोटमध्ये म्हटले आहे. मात्र, पहलगाम हल्ला ज्या दहशतवाद्यांनी केला त्यांना अजुनही पकडण्यात आलेले नाही त्यावरून प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला आहे.

Prakash Ambedkar Narendra Modi
Operation Sindoor : पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी जायला युसूफ पठाणचा नकार; तीन शब्दात सांगितलं कारण

अमित ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाकिस्तानवर विजयाचे प्रतिक म्हणून साजऱ्या केले जात असलेल्या उपक्रमांविषयी समाजात भावनिक संभ्रम असल्याचे म्हटले आहे. ही परिस्थती विजयाची नसून युध्दविराम आहे. म्हणूनच ज्या घटनेत जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव मनाला वेदाना देणार आहेत, असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

Prakash Ambedkar Narendra Modi
Jalgaon Shiv Sena ghost : अरे बाप ! जळगावच्या शिवसेना कार्यालयात भूत? भीतीने कार्यकर्ते फिरकेनात, काय आहे प्रकरण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com