Prakash Mahajan Vs Rane: 'दीड दमडी' उल्लेख करत नारायण राणेंची धमकी,प्रकाश महाजनांचाही करारा जवाब; म्हणाले, 'मीही महाजन...'

Narayan Rane News : माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी धमकीवजा इशारा देताना, तुमच्यासारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही. प्रकाश महाजन तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात.परत बोललात तर उलटया करायला लावेन, असा इशाराच दिला होता. आता राणेंच्या टीकेला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
Prakash Mahajan Vs Narayan Rane .jpg
Prakash Mahajan Vs Narayan Rane .jpgSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येणार या चर्चेवरुन खोचक टीका केली होती. त्या टीकेला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शेलक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. यानंतर माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी धमकीवजा इशारा देताना, तुमच्यासारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही. प्रकाश महाजन (Prakash Mahajan) तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात.परत बोललात तर उलटया करायला लावेन, असा इशाराच दिला होता. आता राणेंच्या टीकेला मनसे नेते प्रकाश महाजन यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेते नारायण राणे आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यात जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. आता महाजन यांनी नारायण राणेंवर पलटवार करताना मी त्यांच्या धमकीला घाबरणारा नाही. मी महाजन आहे, हे त्यांनी विसरू नये, असं करारा जवाब दिला आहे. तसेच या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालायला हवं असंही त्यांनी सांगितलं. याचवेळी फडणवीसांना त्यांनी धमकी देणारे मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असतील तर जनतेचं काय होईल? असा संतप्त सवालही केला आहे.

मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले,राणेंनी मला धमकी दिली आहे. माझ्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर त्याला नितेश राणे जबाबदार राहतील म्हटलं आहे. नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांना मला जीवे मारायचं असेल तर त्यांनी मारावं. लोकशाहीमध्ये तुम्हाला टीका सहन होत नसेल तर त्यांनी दुसऱ्यांवर टीका करू नये अशा कडक शब्दांत सुनावलं.

तसेच मला नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी फोन करू नये. मी उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उभा असेल. हिंमत असेल तर त्यांनी मला जे करायचं आहे ते करावं,असं आव्हान राणेंना देऊन प्रकाश महाजन मोकळेही झाले.

Prakash Mahajan Vs Narayan Rane .jpg
Narayan Rane : मनसे नेत्याच्या टीकेला नारायण राणेंच प्रत्युत्तर, दमही भरला; म्हणाले, 'दीड दमडीच्या, परत बोललात तर ***....'

नारायण राणे यांच्या फेसबुक खात्यावर एक निवेदन करण्यात आलं. त्यांनी या निवेदनात जी भाषा वापरली ती एका प्रकारची धमकीच असल्याचंही महाजन यांनी सांगितलं. त्यानंतर आता नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांचे मला धमकीचे कॉल सुरू आहेत. आपण राजकारणात कोणावरही असभ्य भाषेत टीका केलेली नाही. नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचा तर प्रश्नच नाही. राजकारणात जर टीका सहन होत नसेल तर ते योग्य नाही असा टोलाही प्रकाश महाजन यांनी राणेंना लगावला.

राणे यांच्या निवेदनात काय?

नारायण राणे यांनी फेसबुकवर दिलेल्या निवेदनात म्हणतात,टीव्ही-9 च्या पत्रकारानं प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली.त्यात त्यांनी जे अकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे.श्रीयुत राज आणि माझ्या (नारायण राणे) बद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काही बोलायचे नाही.श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडील आहेत,असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं होतं.

Prakash Mahajan Vs Narayan Rane .jpg
Maharashtra Election Issue : ‘चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघात 15 दिवसांत 12 हजार परप्रांतीय मतदार कसे वाढले?’: काँग्रेसचा खडा सवाल

तसेच श्रीयुत निलेश,नितेश व नारायण राणे हे दुरच वैचारिक उंची तुम्ही ठरवणारे कोण? आमची वैचारिक उंची जनतेने ठरविली आहे.नितेश जनतेतून तीनवेळा निवडून आला आहे.आपण कितीवेळा निवडून आलात ?असा सवालही नारायण राणे यांनी विचारले आहेत.

तुमच्यासारख्या दीड दमडीच्या लोकांकडून…

आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम मी जरुर करेन. आपण निलेश, नितेशना निष्ठा शिकविण्याची गरज नाही.तुमच्यासारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही. प्रकाश महाजन तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात.परत बोललात तर उलट्या करायला लावेन, असा धमकीवजा इशाराच नारायण राणे यांनी दिला होता.

Prakash Mahajan Vs Narayan Rane .jpg
Bachchu Kadu: बच्चू कडूंनी अजित पवारांचा पगारच काढला; म्हणाले, त्यांना अडीच लाख पगाराची..?

प्रकाश महाजन यांची टीका काय...?

नितेश राणे यांना वैचारिक उंची नाही,अशी टीका करताना मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी राणे यांची तुलना लवंग आणि वेलचीशी केली होती.त्यानंतर आता भाजपाचे नेते नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. नारायण राणे यांनी मला धमकी दिली आहे.माझ्या जीवाचं काही बरंवाईट झालं तर त्याला नितेश राणे जबाबदार राहतील,असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com