Prasad Purohit Promoted : मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता, दोन महिन्यांत प्रसाद पुरोहितांना लष्कराने दिलं मोठं गिफ्ट

Prasad Purohit Malegaon Blast : मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातून ले.कर्नल प्रसाद पुरोहित यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मुक्ततेनंतर लष्कराने त्यांना बढती दिली आहे.
Prasad Purohit
sarkarnamaPrasad Purohit
Published on
Updated on

Prasad Purohit News : बहुचर्चित मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणानाच निकाल कोर्टाने 31 जुलैला दिला. निकालपत्रात सात आरोपींना दोषमुक्त करण्यात आले. ले.कर्नल प्रसाद पुरोहित हे देखील या खटल्यात आरोपी होते. त्यांची देखील निर्दोष मुक्तता झाली. या निकालाच्या दोन महिन्यानंतर लष्कराच्या वतीने ले.कर्नल पुरोहित यांना प्रमोशन देत त्यांची कर्नलपदी नियुक्ती केली.

सेवाज्येष्ठनेतेनुसार पुरोहित यांना ही बढती मिळाल्याचे लष्काराच्या दक्षिण विभागाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या मार्फत सांगण्यात आले. मालेगाव बाॅम्बस्फोट खटल्याची तब्बल 17 वर्ष न्यायालयीन लढाई सुरू होती. पुरोहित यांनी निकलानंतर आपल्याला अखेर न्याय मिळाला, अशी भावना व्यक्त केली होती.

पुरोहित यांना मिळालेल्या प्रमोशनचा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, हुशार अधिकाऱ्याला मेजर जनरल या पदापासून काँग्रेसच्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे मुकावे लागले.

मालेगावमध्ये 2008 मध्ये बाॅम्बस्फोट झाला होता. त्यात 100 हून अधिक लोक जखमी झाले होते तर सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

Prasad Purohit
Beed Crime : पत्रकाराच्या मुलाच्या हत्येने बीड पुन्हा हादरलं! वदर्ळीच्या परिसरातच यशला गाठलं अन्...

या बाॅम्बस्फोट प्रकरणात प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स पुरवाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच बाॅम्ब देखील घरी केल्याचा आरोप होता. मात्र, या आरोपांना कोणताही ठोस पुरावा मिळाल नाही. पुरोहित यांच्यासोबत आरोपी असलेले साध्वी प्रज्ञासिंह, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी अजय राहिकरकर, सुधाकर चतुर्वेदी यांची देखील निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

Prasad Purohit
Farmers Loan Waiver : मोठी बातमी! शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार करणार घोषणा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com