Shivsena Split : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचे पाच खासदार कधी फुटणार? शिंदेंच्या खासदाराने मुहूर्त सांगितला

Shivsena Politcs Prataprao Jadhav Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पक्षांतर बंदी कायद्याचा फटका बसू नये म्हणून त्यांना एका खासदारीची आवश्यकता असल्याने उद्धव ठाकरेंचे पाच खासदार फोडण्याची तयारी आहेत.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Split News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का देण्याच्या तयारी एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आधी उद्धव ठाकरे पाच खासदार फोडण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेनी केल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे. त्यातच ठाकरेंचे खासदार नेमके कधी फूटणार याचा मुहूर्तच शिंदेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितला आहे.

जाधव म्हणाले, 'उबाठा गटातील शिवसेनेचे खासदार आणि आमदार नाराज आहेत. पोळा कधी फुटतोय याची लोक वाट पाहातायेत. पोळा ज्या दिवशी फूटेल त्या दिवशी उबाठा गट रिकामा झालेल्या दिसेल.मागच्यावेळी आम्ही मुहूर्त सांगून बाहेर निघालो नव्हतो. त्यामुळे यावेळी ज्या दिवशी मुहूर्त निघेत त्या दिवशी सांगू.'

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पक्षांतर बंदी कायद्याचा फटका बसू नये म्हणून त्यांना एका खासदारीची आवश्यकता असल्याने उद्धव ठाकरेंचे पाच खासदार फोडण्याची तयारी शिंदेंनी केल्याचे साम टिव्हीने आपल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी ठाकरेंसोबत असलेले माजी नगरसेवक देखील मोठ्या प्रमाणात शिंदेसोबत येणार असल्याचा दावा देखील करण्यात येतो आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Shrirampur politics : मुरकुटे अन् छल्लारेंचं ठरलं; एकनाथ शिंदेंना गाठलं अन्...

ऑपरेशन टायगर सुरू

विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पिछेहाट झाली. त्यांचे अवघे 20 आमदार विजयी झाले आहेत. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची पिछेहाट झालेली पाहात लगेच ऑपरेशन टायगर राबवले. ठाकरेंसोबत असलेले माजी आमदार त्यांनी फोडले. ठाकरेतून माजी आमदार, माजी खासदार, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी ऑपरेशन टायगर शिंदेंच्या शिवसेनेकडून राबवण्यात आले. आता ठाकरेंचे पाच खासदार फोडण्याची तयारी करून ऑपरेशन टायगर अजून थांबले नसल्याचे संकेत शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेती युती?

ठाकरेंची पाच खासदार फोडण्याच्या तयारीत असलेले एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेत भाजपसोबत युती करण्याच्या तयारी असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिकेत भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असून 227 जागांपैकी 150 पेक्षा अधिक जागांवर भाजपचा दावा आहे. तर, शिंदेकडून देखील 100 जागांचा दावा करण्यात येत आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Pune BJP: भाजपच्या गोटातून मोठी बातमी: मुळशीच्या वर्षासहलीत कसबा अन् कोथरुडच्या नेत्यांमध्ये बाचाबाची?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com