Maharashtra Kesari : पृथ्वीराज मोहोळ 'महाराष्ट्र केसरी', चित्तथरारक लढतीत महेंद्र गायकवाडचा पराभव

Maharashtra Kesari Prithviraj Mohol Vs Mahendra Gaikwad : आहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. अंतिम लढत महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झाली.
Maharashtra Kesari Prithviraj Mohol Vs Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari Prithviraj Mohol Vs Mahendra Gaikwadsarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Kesari : आहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. अंतिम लढत महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झाली. महेंद्र गायकवाडने माती विभागातून अंतिम लढतीत प्रवेश केला होता. तर, पृथ्वीराज हा मॅट विभागातून अंतिम लढतीत पोहोचला होता. महेंद्र आणि पृथ्वीराज यांच्यात तुल्यबळ लढत झाली. मात्र, कुस्ती चितपट न होता 2-1 प्लॅईंटच्या फरकाने ही कुस्ती पृथ्वीराज मोहोळ यांनी जिंकत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला.

महेंद्र गायकवाड हा लढतीच्या सुरुवातीपासूनच थोडा थकलेला वाटत होता. कुस्तीला सुरवात झाल्यानंतर त्याने कुस्तीची जर्सी बदलण्यासाठी ब्रेक घेतला. त्यानंतर पुन्हा लढत सुरू झाल्यानंतर पृथ्वीराजने एक गुण मिळवला.

त्यानंतर या कुस्तीत पृथ्वीराज वरचढ ठरताना दिसून आला. पृथ्वीराजने दुसरा गुण मिळवल्यानंतर त्यावर महेंद्रने आक्षेप घेतला. महेंद्रने एक गुण मिळवला मात्र पृथ्वीराजच्या दुसऱ्या गुणावर त्याने नाराजी दाखवली. शेवटी काही सेकंद उरलेले असताना महेंद्रने मैदान सोडले. त्यानंतर पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केले.

Maharashtra Kesari Prithviraj Mohol Vs Mahendra Gaikwad
Mohol Politic's : मोहोळच्या माजी नगराध्यक्षाने लोकसभेपासून तिसऱ्यांदा भूमिका बदलली!

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात गादी विभागात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ झाली. या लढतीमध्ये शिवराज राक्षे याला चितपट ठरवताना वाद झाला. आपण चितपट नसताना चितपट दिल्याचा आरोप राक्षे याने करत पंचांची कोलर पकडत लाथ मारली.

त्यामुळे काहीकाळ वातावरण तणावाचे होते. पंचांचा निर्णय अंतिम ठेवत पृथ्वीराज मोहोळ यांना विजय घोषित करण्यात आले. दरम्यान, माती विभागातात सेमी फायनल महेंद्र गायकवाड विरुद्ध विशाल बनकर अशी झाली. या लढतीमध्ये विजय मिळवत महेंद्र गायकवाड याने अंतिम फेरी गाठली.

Maharashtra Kesari Prithviraj Mohol Vs Mahendra Gaikwad
Congress Politics : महाराष्ट्रातील पराभवानंतर काँग्रेसचे महत्वाचे पाऊल; खर्गेंकडून नितीन राऊतांवर मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com