Mohol Politic's : मोहोळच्या माजी नगराध्यक्षाने लोकसभेपासून तिसऱ्यांदा भूमिका बदलली!

Ramesh Baraskar joins Shiv Sena : राजन पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर बारसकर यांनी आगामी निवडणुकीचा विचार करून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. त्यामुळे बारसकरांनी लोकसभेपासून सहा महिन्यांच्या कालावधीत तिसऱ्यांदा भूमिका बदली आहे.
Ramesh Baraskar
Ramesh BaraskarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 02 February : मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवलेले रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. बारसकर यांनी लोकसभा निवडणुकीपासून आतापर्यंत तीनवेळा उड्या मारल्या आहेत. बारसकर हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून लोकसभेला तिकिट न मिळाल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. बारसकर यांनी वंचितमधून थेट हिंदुत्वाचा कट्टर पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत आश्यर्च व्यक्त केले जात आहे.

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नुकतेच पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवडच्या दौऱ्यावर आले होते. माजी राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी सासवड येथे एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते, त्या सभेत मोहोळचे माजी नगराध्यक्ष बारसकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे व शिवसैनिक उपस्थित होते. बारसकर यांच्या बदलेल्या भूमिकेची मात्र चर्चा रंगली आहे.

रमेश बारसकर (Ramesh Baraskar) हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते. मोहोळला नगरपरिषद झाल्यानंतर बारसकर हे पहिले नगराध्यक्ष बनले होते. राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतरही त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यांनी माढ्यातून उमेदवारीची मागणीही केली होती.

Ramesh Baraskar
Solapur Development Plan : अहो आश्चर्यम्‌....अजिंक्यतारा, जलमंदिर म्हणे सोलापुरात!; महापालिका प्रशासनाचा आंधळा कारभार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मात्र माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली, त्यामुळे चिडलेल्या रमेश बारसकर यांनी ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सोलापूरच्या दौऱ्यावर आलेल्या आंबेडकरांनी त्यांची माढ्यातून उमेदवारी जाहीर केली होती. बारसकर यांच्यासाठी आंबेडकरांनी अकलूजमध्ये सभाही घेतली होती. मात्र, माढ्यात बारसकर यांचा पराभव झाला.

लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेला माजी आमदार राजन पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी पाटीलविरोध एकत्र आले होते. त्या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना निवडूनही आणले. त्यामुळे विधानसभा त्यांनी पुन्हा आपली भूमिका बदलली.

Ramesh Baraskar
Satara Politic's : साताऱ्याचे पालकमंत्रिपद मी कधीही मागितले नव्हते; शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

राजन पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव केल्यानंतर बारसकर यांनी आगामी निवडणुकीचा विचार करून शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. त्यामुळे बारसकरांनी लोकसभेपासून सहा महिन्यांच्या कालावधीत तिसऱ्यांदा भूमिका बदली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com