Pune-Bangalore Highway : महाराष्ट्रातील मोठ्या प्रोजेक्टला अचानक ब्रेक? PM मोदींची मान्यता लटकली; स्थगितीची चर्चा, कारण गुलदस्त्यात

Pune-Bangalore Highway : पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाला पीएमओकडून दुसरी मान्यता न मिळाल्याने प्रकल्प रखडल्याची माहिती आहे.
Pune-Bengaluru Greenfield Highway Faces Fresh Setback
Pune-Bengaluru Greenfield Highway Faces Fresh SetbackSarkarnama
Published on
Updated on

Pune-Bangalore Highway : एकीकडे वादग्रस्त शक्तिपीठ महामार्ग रेटला जात असताना, पुणे-बंगळूर ग्रीन फिल्ड राष्ट्रीय महामार्गाला मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून दुसरी मान्यता मिळालेली नाही. हा महामार्ग स्थगित झाल्याची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला एकीकडे मुंबई आणि दुसरीकडे बंगळूरला जोडणाऱ्या या महामार्गाचे रेखांकन थांबवण्यात आले आहे. त्याचे कारण गुलदस्त्यात आहे. या महामार्गाच्या बळावर जिल्ह्यात होऊ शकणाऱ्या सर्वच विकास प्रकल्पांना मोठा फटका बसणार आहे.

सध्या जिल्ह्यातून चार राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. काही पूर्ण झाले, तर काहींचे काम प्रगतिपथावर आहे. मात्र अन्य महामार्गापेक्षा महत्त्वाचा, गतिमान द्रुतगती मार्ग म्हणून ‘पुणे-बंगळूर’कडे पाहिले जाते. खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यांतून हा महामार्ग कर्नाटकात अथणीमार्गे बंगळूरला जोडणार होता.

मिरजमधील सलगरे येथे ड्रायपोर्टसाठी जागा सुचवण्यामागे या महामार्गाच्या ‘कनेक्टिव्हिटी’चा प्रमुख मुद्दा होता. खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील यांनी सलगरे येथे या महामार्गाला ‘कनेक्टिव्हिटी’ द्यावी, यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे आग्रह धरला. त्याबाबत गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. या महामार्गाचे रेखांकन निश्चित करण्यासाठी प्रक्रियादेखील सुरू झाली.

Pune-Bengaluru Greenfield Highway Faces Fresh Setback
Kolhapur High Court Bench : कोल्हापूरकरांसाठी सर्वात मोठी बातमी! खंडपीठासाठी तब्बल 495 जागांची लवकरच होणार भरती...

गडकरी यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात ‘मी सांगलीत महामार्गावर विमान उतरवणार आहे’, अशी घोषणा केली होती. त्यासाठी बेळंकी-सलगरे या गावांच्या मधला टप्पा निश्चित करण्याचे नियोजन होते. जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग ठरेल, अशी अपेक्षा होती. आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. अद्यापपर्यंत मान्यताच मिळालेली नाही. ती मिळण्याची शक्यता धूसर असल्याची चर्चा आहे. रेखांकन थांबवण्यात आले आहे.

Pune-Bengaluru Greenfield Highway Faces Fresh Setback
मोठा धक्का! जाहीर कार्यक्रमात भाजपच्या दिग्गज नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी; राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्र-कर्नाटकचे खासदार भेट घेणार

‘पुणे-बंगळूर ग्रीनफिल्ड हाय-वे’ हा सुमारे ७०० किलोमीटर लांबीचा आणि ६ ते ८ मार्गिकांचा प्रस्तावित आहे. सध्या १४ ते १५ तासांचा प्रवास केवळ ७ ते ८ तासांत पूर्ण होऊ शकतो. हा प्रकल्प ‘प्रधानमंत्री भारतामाला परियोजने’अंतर्गत करण्याचे नियोजित आहे. सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग ज्या लोकसभा मतदार संघातून जातो, तेथील खासदार या महामार्गासाठी आग्रही आहेत. ते नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com