

Sangli News : आगामी काळात मुदत संपत असलेल्या राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. या मतदारसंघासाठी मतदार नोंदणी करण्याचा शेवटचा दिवस 26 सप्टेंबर 2026 होता. त्यानंतर आता लवकरच अधिसूचना जरी होणार असून 23 ऑक्टोबरला मतदनं होणार आहे तर मतमोजणी व निकाल 27 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीमधील तीन पक्षात जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. त्यातच भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेच्या या दोन जागांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार दोन दिवसात निश्चित होतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सांगली येथे प्रसार माध्यमाशी बोलताना राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दावा केला आहे. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक विधानपरिषद मतदार संघ या दोन्ही जागा पारंपरिकरित्या आमच्याच आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. या दोन्ही जागेवरच्या निवडणुका महायुती म्हणूनच आम्ही लढवणार असून याबाबत दोन्ही उमेदवार दोन दिवसात जाहीर केले जातील, असेही पाटील म्हणाले.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra pawar) या तिघांमध्ये बैठक होईल आणि उमेदवार निश्चित होईल. हे तिघेजण जो निर्णय घेतली तो आम्ही मान्य करू, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी तयारी केली आहे. तर त्यासोबतच सचिन सानप, कौस्तुभ गावडे यांनी देखील पुणे शिक्षकसाठी तयारी सुरु केली आहे. त्यासोबतच या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दोन्ही जागा जिंकल्या होत्या. पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुण लाड विजयी झाले होते. तर, पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी झाले होते. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. आता राज्यात महायुतीचे सरकार असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झालेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.