PMC News: ​पुण्यात गल्लीबोळातील 'नावाच्या' राजकारणाला चाप! प्रशासनाने शोधला 'जालीम' उपाय

PMC Road Naming Controversy: रस्त्यांच्या नावावरून सुरू असलेल्या वादात पुणे महापालिकेचा मोठा निर्णय घेतला आहे. आता ‘स्ट्रीट नंबर’ प्रणाली लागू करून गोंधळ टाळण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे.
PMC Road Naming Controversy
PMC Road Naming Controversy Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यात एखाद्या गल्लीला कोणाचं नाव द्यायचं? यावरून महापालिकेत तासन् तास चर्चा होतात, वाद होतात आणि कधी कधी तर राडाही होतो. 'आमच्याच नेत्याचं नाव कसं नाही?' इथून सुरू झालेला हा श्रेयवाद मिटवण्यासाठी आता पुणे महापालिका प्रशासनाने एक 'जालीम' उपाय शोधला आहे.

पुणे महापालिकेत सध्या या नव्या प्रस्तावाची जोरदार चर्चा सुरू आहे. रस्ते आणि चौकांच्या नामकरणावरून होणारा राडा, स्थानिक नेत्यांमधील श्रेयवाद आणि महापालिकेच्या सभागृहात उडणारे खटके या सगळ्याला पूर्णविराम देण्यासाठी प्रशासनाने आता एक मोठी खेळी खेळली आहे. ज्या रस्त्यांची रुंदी ९ मीटरपेक्षा कमी आहे, अशा गल्लीबोळांना आता कोणत्याही थोर व्यक्तीचे किंवा नेत्याचे नाव न देता थेट 'क्रमांक' देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

पुणे शहरात गल्लीबोळांना नाव देण्यासाठी स्थानिक नगरसेवकांमध्ये नेहमीच चढाओढ असते. पण आता महापालिका प्रशासनाने नियमावलीच बदलली आहे. नव्या प्रस्तावानुसार, ९ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांचे नामकरण केले जाणार नाही. त्याऐवजी त्यांना 'गल्ली क्रमांक १, २, ३' अशा पद्धतीने ओळख दिली जाईल. यामुळे नावासाठी होणारी ओढाताण आपोआपच थांबणार आहे.

PMC Road Naming Controversy
Rahul Gandhi News: 'स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी सावरकरांनाच का? राहुल गांधींच्या वकिलांचा न्यायालयात थेट सवाल!

जर एखाद्या विशिष्ट गल्लीला नाव द्यायचेच असेल, तर केवळ सत्ताधारी पक्षाच्या किंवा बहुमताच्या जोरावर ते शक्य होणार नाही. त्यासाठी महापालिकेच्या सर्वपक्षीय सदस्यांची एकमताने संमती आवश्यक असणार आहे.

PMC Road Naming Controversy
Maval APMC News: आमदार सुनील शेळके यांची राजकीय खेळी यशस्वी! मावळ बाजार समिती बरखास्त

'स्ट्रीट नंबर'

परदेशात ज्या पद्धतीने तिथे 'स्ट्रीट नंबर' असतात. त्याच धर्तीवर पुण्याचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र ​हा प्रस्ताव सध्या पक्षनेत्यांच्या बैठकीत अंतिम निर्णयासाठी जाणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयावर स्थानिक नेते नाराज होण्याची शक्यता असल्याने नेमका यावर काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com