Chandrapur Mayor : चंद्रपूरमधील गेम उद्धव ठाकरेंना परभणीत महागात पडणार? काँग्रेस वेगळ्या निर्णयाच्या तयारीत; प्रदेशाध्यक्षांनी दिले संकेत

Chandrapur Mayor : चंद्रपुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला साथ दिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संतापले आहेत. "परभणीत आम्ही आमच्या सोयीने वागायचं का?" असा सवाल करत त्यांनी ठाकरेंच्या पक्षाला महायुतीबाहेरचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Congress State President Harshvardhan Sapkal addressing the media, expressing his outrage over Shiv Sena (UBT)'s decision to support the BJP in the Chandrapur Mayor election, sidelining the MVA alliance.
Congress State President Harshvardhan Sapkal addressing the media, expressing his outrage over Shiv Sena (UBT)'s decision to support the BJP in the Chandrapur Mayor election, sidelining the MVA alliance.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena-Congress News : चंद्रपूर महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठिंब्यावर सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांच्या संघर्षातून काँग्रेसच्या नेतृत्वाने कसाबसा मार्ग काढला. काँग्रेस- उद्धव ठाकरेंचा पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार, असे कालर्यंतचे चित्र रात्रीतून पालटले. आज महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी चक्क भाजपला पाठिंबा दिला. या जोरावर भाजपचा महापौर विराजमान झाला. त्यावर आता परभणी महापालिकेत काँग्रेसने असचं वागायचं का? असा सवाल करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सूचक इशारा दिला आहे.

काँग्रेसचे सत्तेचे स्वप्न धुळीस मिळाल्यानंतर आता चंद्रपूरमध्ये झालेल्या दगाबाजीचा बदला काँग्रेस परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हात दाखवून घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. परभणी महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस आघाडीने बहुमतासह सत्ता मिळवली आहे. खासदार संजय जाधव यांनी जातीय समीकरणं जुळवून आणत सत्ताधारी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसला रोखले.

परंतु आता 'दैव देत आणि कर्म नेतं' अशी परिस्थिती चंद्रपूरमधील घडामोडीमुळे निर्माण झाली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या विषयावर प्रतिक्रिया देताना चंद्रपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आम्हाला पाठिंबा देणे अभिप्रेत होते. पण तसे झाले नाही, आता याचे परिणाम महाराष्ट्रात उमटतील अशी परिस्थिती आहे. परभणीत आमची शिवसेनेसोबत आघाडी होती. तिथे त्यांचे नगरसेवक आमच्यापेक्षा जास्त निवडून आले आहेत. मग आता आम्ही चंद्रपूर सारखं तिथं वागायचं का? असा सवाल सपकाळ यांनी केला आहे.

Congress State President Harshvardhan Sapkal addressing the media, expressing his outrage over Shiv Sena (UBT)'s decision to support the BJP in the Chandrapur Mayor election, sidelining the MVA alliance.
Chandrapur Mayor: चंद्रपूरमध्ये काँग्रेससोबत पहाटे 4 वाजेपर्यंत बैठक, सकाळी उठून ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत : वडेट्टीवार समर्थक, MIM अन् वंचितचीही मदत

या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांनी शिवसेना आघाडीच्या सर्व नगरसेवकांना सहलीवर पाठवल्याची माहिती आहे. 12 तारखेला हे सगळे नगरसेवक थेट महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीवेळी थेट महापालिकेत दाखल होतील असे सांगितले जाते. दगाफटका होऊ नये याची काळजी दोन्ही बाजूंनी घेतली जात असली तरी चंद्रपूरमधील प्रकारामुळे या सगळ्यावर आता पाणी फिरण्याची वेळ आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे 25 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक निवडून आले आहेत.

Congress State President Harshvardhan Sapkal addressing the media, expressing his outrage over Shiv Sena (UBT)'s decision to support the BJP in the Chandrapur Mayor election, sidelining the MVA alliance.
Chandrapur politics: चंद्रपूरमध्ये भाजपची 'मास्टर' चाल! ठाकरेंच्या शिवसेनेला पायघड्या; महापौरपदाच्या निवडीवेळी 10 फेब्रुवारीला 'खेळ' फिरणार?

भाजपकडून संधी शोधली जात आहे, काही नगरसेवकांना संपर्क केला जात असल्याचीही चर्चा आहे. पण खासदार संजय जाधव हे सतर्क आहेत. यातूनच त्यांनी सर्व नगरसेवकांना सहलीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेत महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला मदत करणाऱ्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांना या निर्णयाबद्दल अंधारात ठेवल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com