Pune Porsche Accident : 'पोलिसांना कोणत्या मंत्र्याचा फोन आला होता?' 'वंचित'चा सवाल

VBA Prakash Ambedkar :आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला फारच कमी शिक्षा देण्याचा नियम आता शिथिल करायला हवा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
Pune Porsche Car Accident:
Pune Porsche Car Accident:Sarkarnama

Pune Porsche Accident : कल्याणीनगर पोर्शे कार अपघातात प्रकरणी नवनवी माहिती समोर येत आहे. दोन पोलिस अधिकारी, दोन डाॅक्टर एक वाॅर्डबाॅय या प्रकरणात निलंबित झाले आहे. या प्रकरणात पोलिसांना रात्री एका मंत्र्याचा फोन आल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांवरून वंचित बहुजन आघाडीने विशाल अगरवाल याची कोणकोणत्या राजकीय पक्षांबरोबर भागीदारी आहे? असा थेट सवाल केला आहे.

या प्रकणात रात्री पोलिसांना कुठल्या तरी मंत्र्याने फोन केला होता, अशी माहिती आहे. विशाल अगरवाल याच्या कंपनीत कोणकोणत्या मंत्र्यांचे पैसे गुंतलेले आहेत? कोणकोणत्या नेत्यांबरोबर त्याचे हितसंबंध आहेत? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

Pune Porsche Car Accident:
Dilip Mohite On Jogendra Katyare: पुण्याचे कलेक्टर दिवसे-कट्यारेंमधल्या वादाला मोहितेंकडून राजकीय तडका; अधिकाऱ्यांत खमंग चर्चा

राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत आहे आणि अशा बऱ्याच अपघातांमध्ये वाहनांचा चालक अल्पवयीन असल्याचं निदर्शनास आलं आहे. परंतु, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधील आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला फारच कमी शिक्षा देण्याचा नियम आता शिथिल करायला हवा. किमान अशा गंभीर अपघातांच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराला मोठी शिक्षा व्हायलाच हवी, अशी मागणी देखील 'वंचित'ने केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

न्यायालयाला विनंती

पुण्यात जो अपघात झाला ते प्रकरण गंभीर आहे. प्रसारमाध्यमांना या प्रकरणाचं गांभीर्य समजलं असून त्यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु, न्यायालयाने या प्रकरणात अद्याप फारसं गांभीर्य दाखवलेलं दिसत नाही, असा दावा वंचितने केला आहे. तसेच हा एक गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे आरोपीविरोधात न्यायालयाने कठोर निर्णय घ्यायला हवेत, अशी विनंती न्यायालयाला वंचितने ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

Pune Porsche Car Accident:
Rohit Pawar On Uday Samant : 'उद्योगमंत्री नेमके कोणते 'उद्योग' करता?'; सामंतांना आमदार पवारांचा सवाल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com