Rahul Gandhi News : सध्या कोणतीही निवडणूक तोंडावर नसताना काँग्रेस पक्षाने अचानक गिअर बदलला असून, थेट ‘अलर्ट मोड’वर येत विरोधकांना धोक्याचा इशारा दिला आहे. राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी नाशिकमध्ये तब्बल १० दिवसांच्या विशेष निवासी प्रशिक्षणाचा धडाका लावला जाणार आहे.
काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीच्या प्रशिक्षण शाखेतर्फे आयोजित ‘सृजन अभियाना’वर भाजपच्या नेत्यांच्या नजरा अधिक खिळल्या आहेत.
या निवासी शिबिरात युथ काँग्रेस आणि विद्यार्थी संघटना म्हणजेच झेन झीवर विशेष भर दिला जाणार आहे. देशभरातील तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी राहुल गांधी यांनी आखलेल्या आक्रमक रणनीतीचा हा मुख्य भाग आहे.
नाशिकच्या या शिबिरासाठी स्वतः राहुल गांधी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते ऐतिहासिक काळाराम मंदिर आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहेत. अयोध्येतील कथित चंदाचोरीच्या मुद्द्यावरून अडचणीत आलेल्या भाजपसाठी राहुल गांधींचा हा मंदिर दौरा थेट आणि मोठा राजकीय इशारा मानला जात आहे.
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने केंद्र सरकारला आधीच हादरवून सोडले होते, ज्या मुळे भाजपला आपल्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला होता. पावसाळी अधिवेशनातही विरोधकांच्या आक्रमकतेमुळे सत्ताधाऱ्यांना बॅकफूटवर जावे लागले होते. आता कोणत्याही निवडणुका नसताना काँग्रेसने सुरू केलेल्या या १० दिवसांच्या निवासी शिबिरामुळे महाराष्ट्रातील भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.