Rahul Narwekar Trouble : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे काँग्रेसने वाढवले टेन्शन; 'तो' व्हिडिओ दाखवत निवडणूक आयोगाकडे धाव

Rahul Narwekar Vs Congress Harshvardhan Sapkal : राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आणला, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
Rahul Narwekar
Rahul NarwekarSarkarnama
Published on
Updated on

BMC Election : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे टेन्शन वाढले आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकावत असल्याच्या व्हिडिओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केला असून थेट नार्वेकर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

सपकाळ यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून त्यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय असलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांवर कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करून घेऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आणला, विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकावले हे अत्यंत गंभीर आहे. राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर आहेत, त्यांच्याकडून अशापद्धतीने कायदा धाब्यावर बसवून दडपशाहीचा मार्ग अवलंबणे लोकशाहीचा खून करण्यासारखे कृत्य आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.

मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्रमांक २२५, २२६ व २२७ मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहिण गौरबी शिबलकर व वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी भाजपा कडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर हे स्वतः उपस्थित होते. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना राहुत नार्वेकर यानी पोलिसांच्या माध्यमातून भाजपा उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकावले तसेच अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले,असे देखील सपकाळ यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

Rahul Narwekar
Bunty Jahagirdar murder : राजकीय वर्चस्वातून बंटी जहागीरदारला 'टिपला'; गोळ्या झाडताना दोघा आरोपींकडून 'एकच भाई...', असा उल्लेख!

'त्या' कर्मचाऱ्यांची कारवाई करा

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या कुटुंबातील तीन सदस्य निवडणुकीत उभे आहेत, त्यांच्या प्रचारासाठी नार्वेकर यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी काम करत आहेत. शासकीय पदावरील हे अधिकारी व कर्मचारी एका पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भाग घेत असतील तर ते कायद्यानुसार चुकीचे आहे, असे म्हणत सर्व ७० अधिकारी व कर्मचारी यांना कार्यमुक्त करून त्यांच्यावरही आचार संहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत, अशी देखील मागणी सपकाळ यांनी केली आहे.

Rahul Narwekar
ZP Nivadnuk: झेडपीसाठी कोट्यवधींची उधळण! इच्छुकांची धावपळ; धार्मिक सहली अन् साड्यांचे वाटप सुरू

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com