

Pune News : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी, नागरिक आणि पशुपालकांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक नियोजन सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
दरम्यान, आज अनंत चतुर्दशी असल्याने राज्यभर गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत सुनेत्रा पवार यांनी विधीवत पूजा आणि आरती केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना गणेश विसर्जनासोबतच महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले.
दुष्काळाच्या मुद्द्यावर बोलताना राज्य सरकार परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक मदत मिळावी, यासाठी पाणीपुरवठा, चारा आणि इतर आवश्यक उपाययोजनांवर प्रशासन काम करत आहे. सुनेत्रा पवार यांनी यापूर्वीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत.
पुण्यातील विसर्जन मिरवणुकीबाबत बोलताना सुनेत्रा पवार यांनी नागरिक आणि गणेश मंडळांना शिस्तबद्ध व पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाला निरोप देण्याचे आवाहन केले. पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला राज्यभरातून भाविक येत असल्याने सर्वांनी सहकार्य करून हा सोहळा शांततेत पार पाडावा, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुष्काळासंदर्भात सरकारचा निर्णय लवकरच होणार असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे आता शासनाच्या मदतीकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.