Raj Thackeray On Woman Day : राजकारण, समाजकारणात चांगलं काम करायचं अशा महिलांनी माझ्या पक्षात यावं! इथे तुमच्या सर्जनशीलतेला पूर्ण वाव असेल..

Raj Thackeray wishes on International Women's Day and urges women to join his political party for a better future. : आज भारतच काय जगासमोर जी अनेक आव्हानं आहेत, त्या आव्हानांपैकी सगळ्यात गंभीर कुठलं आव्हान असेल तर ते पर्यावरणाच्या ह्रासाचं. आणि यावर अगदी मुळापासून काम कोण करू शकत असेल तर त्या महिलाच हे माझं ठाम मत आहे.
MNS Raj Thackeray News
MNS Raj Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

MNS News : जागतिक महिला दिनानिमित्त राजकीय क्षेत्रातून नारी शक्तीचा सन्मान करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या स्पष्ट आणि सडेतोड भूमिकेसाठी ओळखले जातात. महिलांचे राजकारण आणि समाजकारणातील योगदानाचा उल्लेख करत त्यांनी महिला दिनाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

ज्यांना फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात चांगल काम करायचं आहे, त्यांनी माझ्या पक्षात यावं, असे आवाहन करतानाच इथे तुमच्या सर्जनशीलतेला पूर्ण वाव असेल, असा विश्वासही राज ठाकरे यांनी समस्त महिला वर्गाला आजच्या निमित्ताने दिला आहे. (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी 'एक्स'वर जागितक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट केली आहे.

सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व माता-भगिनींना मनापासून शुभेच्छा. (MNS) मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये म्हणत आलो आहे की, जर आसपास मोठं परिवर्तन अपेक्षित असेल तर स्त्रियांचा राजकारणातील सहभाग हा वाढायलाच हवा आणि त्यासाठी फक्त आरक्षण देऊन पुरेसं नाही तर महिलांनी राजकारणात येऊन त्यांना त्यांचे निर्णय स्वतंत्रपणे घेण्यासाठीची व्यवस्था निर्माण करायला हवी.

MNS Raj Thackeray News
Raj Thackeray: जोशीबुवा, मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे लक्षात ठेवा! राज ठाकरे संतापले

आज भारतच काय जगासमोर जी अनेक आव्हानं आहेत, त्या आव्हानांपैकी सगळ्यात गंभीर कुठलं आव्हान असेल तर ते पर्यावरणाच्या ह्रासाचं. आणि यावर अगदी मुळापासून काम कोण करू शकत असेल तर त्या महिलाच हे माझं ठाम मत आहे. याबाबतच एक फारच चांगलं उदाहरण आहे ते 'पूर्णिमा देवी बर्मन' यांचं. 'टाईम' या प्रख्यात आंतरराष्ट्रीय मासिकाच्या 2025 सालच्या 'विमेन ऑफ द इयर' च्या यादीत ज्यांचा समावेश आहे, त्या 'पूर्णिमा देवी बर्मन'.

MNS Raj Thackeray News
MNS Vs Ajit Pawar : भाजपचा पदर पकडून अन्‌ मोदींचं नाव घेऊन आम्ही मतं मिळविली नाहीत; मनसेचा अजितदादांवर पलटवार (Video)

आसामच्या कामरूप भागात जन्मलेल्या पूर्णिमा देवी यांचं शिक्षण प्राणिशास्त्रातलं आणि, पुढे त्यांनी जैवविविधता या विषयांत पीएचडी संपादन केली. हे सुरु असताना 2007 ला त्यांना एक शेतकरी झाडाची फांदी कापताना दिसला. कारण काय? तर त्यावर करकोच्याच घरटं होतं. हा पक्षी आसाममध्ये फारसा शुभ मानला जात नव्हता, मग अशा पक्षाचं घर माझ्या आवारात का ? म्हणून त्याचं घरटंच नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु होता.

MNS Raj Thackeray News
International Women's Day : "एक खून करण्याची परवानगी द्या..." महिला दिनीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची राष्ट्रपतींकडे खळबळजनक मागणी

एक पक्षी जर अशाप्रकारे उध्वस्त झाला तर फक्त तो पक्षी नाही संपूर्ण पर्यावरणाची व्यवस्थाच बिघडेल, हे त्यांच्यातल्या जैवविविध अभ्यासकाला माहित होतं. म्हणून त्यांनी 'ह्रगिला आर्मी' थोडक्यात 10000 स्त्रियांचा एक ग्रुपच तयार केला आणि संपूर्ण आसाममध्ये त्यांनी करकोचा पक्षी वाचवण्यासाठी एक चळवळ सुरु केली. याचा दृश्य परिणाम म्हणजे पुढे 16 वर्षांत करकोचे जे नामशेष पक्ष्यांच्या यादीत गेले होते ते पुन्हा पुनर्स्थापित झाले आणि या दहा हजार महिलांसाठी पूर्णिमा देवींनी बचत गट देखील तयार केले.

MNS Raj Thackeray News
Devendra Fadnavis : मोठी बातमी: सरनाईकांना दणका देणारा 'तो' निर्णय मागे; CM फडणवीसांनी शिंदेंसोबतचा वाढत चाललेला दुरावा झटक्यातच दूर केला!

अशी उदाहरणं ही देशात आणि महराष्ट्रात देखील आहेत. अशा कामांबाबतची महिलांची अंतःप्रेरणा ही शक्तिशाली असते आणि त्यातून निर्माण होणारं काम मोठं असतं हा अनुभव आहे. या अंतःप्रेरणेला, शक्तीला अधिक ताकद मिळू दे हीच इच्छा. माझ्या पक्षात मी अनेक महिला मेळाव्यात सांगितलं आहे की ज्यांना फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात सुद्धा काही चांगलं काम करायचं असेल त्यांनी जरूर यावं, इथे तुमच्या सर्जनशीलतेला पूर्ण वाव असेल, असा विश्वास राज ठाकरे यांनी दिला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com